केरळ : काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पुन्हा एकदा निशाणा साधलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'तीन वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेवर आले, कारण जनतेला त्यांच्याकडून खूप अपेक्षा होत्या. देशातील अधिकांश लोकांना नरेंद्र मोदी आणि त्यांच्या शब्दांवर विश्वास होता. परंतु, आज मात्र परिस्थिती बदलतेय. आज तीन वर्षांनंतर मोदींच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह (credibility crisis) उपस्थित झालंय', असं राहुल गांधी यांनी म्हटलंय. 


त्रिवेंद्रममध्ये एका जाहीर कार्यक्रमात बोलताना राहुल गांधींनी हे वक्तव्य केलंय. यावेळी काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेतेही उपस्थित होते.  


भाजप आणि आरएसएस लोकांना जात आणि धर्माच्या नावावर विभागण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोपदेखील राहुल गांधींनी यावेळी केला.