अनंतनाग : अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवर काश्नीरमध्ये अतिरेक्यांनी हल्ला केला आहे. यामध्ये ७ यात्रेकरूंचा मृत्यू झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. अमरनाथ यात्रेकरूंवर झालेल्या हल्ल्यामुळे मला दु:ख झालं आहे. भारत अशा भ्याड हल्ल्यांपुढे कधीच झुकणार नाही, असं मोदी म्हणालेत. जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री आणि राज्यपालांबरोबर मी चर्चा करून सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे, असं ट्विट नरेंद्र मोदींनी केलं आहे.







COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


अमरनाथच्या यात्रेकरूंच्या बसवर दहशतवाद्यांनी फायरींग केली. या हल्ल्यात अनेक यात्रेकरू जखमी झालेत. या हल्ल्यानंतर अमरनाथ यात्रा थांबवण्यात आलीय. हल्ला झालेली बस बालतालहून मीरबझारकडे निघाली होती. त्यावेळी अतिरेक्यांनी बसवर अंधाधुंद फायरींग केली. हल्ल्यानंतर श्रीनगर जम्मू हायवे सुरक्षादलांकडून बंद करण्यात आलाय.