नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी देशवासियांना रमजान पर्वाच्या शुभेच्छा दिल्या. आजपासून रमजानच्या पवित्र महिन्याला सुरुवात झाली आहे. आता उद्यापासून मुस्लीम बांधव रोजा पाळायला सुरुवात करतील. मात्र, यंदाच्या रमजानवर कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे मोदींनी सर्वांना रमजानच्या शुभेच्छा देताना तुम्ही सर्वजण सुरक्षित राहा, अशी प्रार्थनाही केली. सोबतच यावेळी पंतप्रधानांनी कोविड-१९ विरुद्ध लढाई विजय मिळवण्याचा विश्वासही व्यक्त केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'मोदींकडे कोणतीही ठोस योजना नाही, ते केवळ लॉकडाऊनची घोषणा करून मोकळे झाले'

दरम्यान, कोरोनामुळे कोणीही नमाज अदा करण्यासाठी घराबाहेर पडू नये, असे आवाहन मुस्लिम समजातील धर्मगुरू आणि नेत्यांकडून करण्यात आले आहे.  मुस्लीम बांधवांना आपल्या घरीच 'इबादत' करावी, असा सल्ला लोकांना देण्यात आला आहे. 



'सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात कपात करण्यापेक्षा बुलेट ट्रेनचा प्रकल्प गुंडाळा'

भारतातील कोरोनाबाधितांचा आकडा शुक्रवारी २३,०७७ वर जाऊन पोहोचला. तर आतापर्यंत कोरोनामुळे ७१८ जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण २०.५७ टक्के इतके आहे.  गेल्या २८ दिवसांमध्ये १५ जिल्ह्यांमध्ये एकही नवा कोरोनाबाधित रुग्ण आढळला नसल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.