नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या गुजरात दौऱ्यावर आहेत. विशेष म्हणजे पंतप्रधान झाल्यापासून पहिल्यांदाच ते आपले जन्मगाव वडनगरला भेट देत आहेत. वाडनगरला पोहोचल्यावर मोदींनी आपल्या शाळेला भेट दिली. तिथे त्यांनी एक कृती केली ज्याची चर्चा होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान मोदींनी वडनगर या जन्मगावी पोहोचल्याव बालपणीची शाळा बीएन हायस्कूलला भेट दिली. इथेच मोदींचे शिक्षण बालपणीचे शिक्षण पूर्ण झाले. या शाळेला मोदींनी नमस्कार केला. शाळेला नमस्कार करतान मोदी अचानक खाली बसले आणि त्यांनी शाळेच्या मैदानावरची माती हातात घेतली. मोदींनी असे का केले या विचारात सर्वजन असतानाच त्यांनी तीच माती आपल्या कपाळाला लावली. यावेळी मोदींनी उपस्थीत नागरिकांशी हस्तांदोलनही केले.



वडनगर हे गुजरातमधील महसाणा जिल्ह्यात येते. हे ठिकाण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जन्मठिकाण. या गावच्या मातीतच पंतप्रधानांनी बालपणीचे शालेय धडे गिरवले. पंतप्रधान येणार म्हणून वडनगर सजविण्यात आले होते. गुजरात दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी रविवारी पंतप्रधानांनी वायुसेनेच्या विमानातून वाडनगर येथील हेलिपॅडवर पाऊल ठेवले. त्यानंतर त्यांनी हाटेश्वर मंदिरापासून पाच किलोमिटर अंतरावर रोड शो केला. रोड शो दरम्यान संपूर्ण रस्त्यावर पंतप्रधानांच्या वडनगरच्या आठवणींच्या प्रतिमा लावण्यात आल्या आहेत. हाटेश्वर मंदिर ते बीएन हायस्कूल असा त्यांचा रोड शो पार पडला. हाटेश्वर मंदिरा मोदींनी महादेवाची पूजा केली.


वडनगर दौऱ्यात मोदींनी वडनगर रेल्वे स्टेशनलाही भेट दिली. वडनगरच्या याच रेल्वे स्टेशनवर मोदींच्या आईवडीलांचे चहाची दुकान होते असे सांगितले जाते. या चहाच्या दुकानात मोदी चहा विकायचे, असेही सांगितले जाते. मोदींचे आगमन होणार म्हणून हे स्टेशन खास पद्धतीने सजविण्यात आले होते. सजावटीदरम्यान चहाची किटली ही खास आकर्षण म्हणून ठेवण्यात आली होती.