३ राज्यांमध्ये १० हजारने चाचणी क्षमता वाढणार- पंतप्रधान
सध्याच्या चाचणी क्षमतेत १० हजारांनी वाढ
नवी दिल्ली : महाराष्ट्र, यूपी आणि बंगालमधील चाचणी क्षमता १० हजारने वाढणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. आज हाय टेक स्टेट ऑफ द आर्ट टेस्टिंग सुविधेला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर ट्वीटरवर त्यांनी ही माहिती दिली. दिल्ली-NCR, मुंबई आणि कोलकातामध्ये आर्थिक केंद्र आहे. इथे लाखो तरुण आपलं करियर आणि स्वप्न पूर्ण करण्यास येतात. त्यामुळे इथल्या सध्याच्या चाचणी क्षमतेत १० हजारांनी वाढ होत असल्याचे ते म्हणाले.
हायटेक लॅब्स केवळ कोरोना चाचणीसाठी मर्यादित नसून इथे इतरही चाचण्या होतील असेही ते म्हणाले. भविष्यात हेपिटायटीस बी आणि सी, एचआयव्ही, डेंग्युसहित अनेक आजारांच्या चाचण्या या लॅबमध्ये होणार आहेत.
देशामध्ये योग्यवेळी निर्णय घेतले गेले त्यामुळे भारत इतर देशांच्या तुलनेत चांगल्या स्थितीत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. इथला मृत्यूदर मोठमोठ्या देशांच्या तुलनेत कमी आहे. कोरोना स्पेसिफीक हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चरचं उभारणं महत्वाच होत. यासाठी आधीच १५ हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा करण्यात आली होती असेही ते म्हणाले.
महत्वाचे मुद्दे
आयसोलेशन सेंटर, कोविड स्पेशल हॉस्पिटल, टेस्टिंग, ट्रेसिंग आणि ट्रॅकिंगशी संबंधित जोडलेले नेटवर्क अशा क्षेत्रात भारताने आपल्या क्षमतेचा विस्तार केला.
आज भारतामध्ये ११ हजाराहून जास्त कोविड फॅसिलीटी आहेत. ११ लाखाहून जास्त आयसोलेशन बेड आहेत. जानेवारीमध्ये कोरोनासाठी एक टेस्ट सेंटर होते.. आज १३०० लॅब्स पूर्ण देशामध्ये कार्यरत आहेत. तसेच भारतात ५ लाखाहून अधिक टेस्ट दररोज होत असल्याचे ते म्हणाले.
भारतीयांना वाचविणे हे एकच उद्देश प्रत्येक भारतीयाचा होता. याचे सकारात्मक परिणाम दिसले. पीपीई किट, मास्क आणि टेस्ट किटमध्ये भारत यशस्वी आहे.
६ महिन्यांपुर्वी देशात पीपीई किट बनत नव्हते. पण आज १२०० हून अधिक उत्पादक दररोज ५ लाखाहून अधिक पीपीई किट बनवत आहेत.
एक वेळ अशी होती जेव्हा एन ९५ मास्क बाहेरुन घ्यावे लागत होते. पण आता भारतात ३ लाखाहून अधिक एन ९५ मास्क दररोज बनतात.
मानवी साखळी तयार करण्याचं मोठं आव्हान होतं. पण पॅरामेडिकल, आशा वर्कर, अंगणवाडी आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांना दिलेले प्रशिक्षण अभुतपूर्व आहे.
कोरोनाच्या वॅक्सिनसाठी आपल्या देशात जोरदार प्रयत्न सुरु आहेत. जोपर्यंत वॅक्सिन बनत नाही तोपर्यंत मास्क आणि सुरक्षित अंतर गरजेच असल्याचे ते म्हणाले.