नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडियो कॉन्फ्रेंसिंगच्या माध्यमातून ई-वाउचर-बेस्ड डिजिटल पेमेंट सॉल्यूशन e-RUPI लॉन्च केले. हे डिजिटल पेमेंटसाठी एक कॅशलेस आणि कॉन्टॅक्टलेस इंस्ट्रूमेंट आहे. क्यूआर कोड किंवा SMS स्ट्रिंगच्या आधारावर ई-वाउचर म्हणून काम करतं. PM Narendra Modi e-RUPI Launch


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी आपल्या ट्विटर हँडलवर याबाबतची माहिती शेअर केली होती. पीएम मोदींनी म्हटलं की, यामुळे सर्विस देणाऱ्या आणि घेणारा दोन्ही कनेक्ट होतील. सोबतच इतर योजनांचा देखील फायदा मिळेल.


हे पूर्णपणे कॅशलेस आणि कॉन्टॅक्टलेस आहे. e-RUPI ला नॅशनल पेमेंट्स कॉरपोरेशन ऑफ इंडियाने आपल्या UPI प्लेटफॉर्मवर वित्त सेवा विभाग, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय तसेच राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणसाठी तयार केले आहे.


e-RUPI हा वेलफेयर सर्विस डेटा लीक होण्यापासून वाचवण्यासाठी त्या दिशेने टाकलेलं एक क्रांतीकारी पाऊल आहे. याचा वापर आयुष्मान भारत, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, सबसिडी सारख्या योजनांमध्ये होऊ शकतो. या शिवाय मातृ एवं बाल कल्याण योजना, टीबी उन्मूलन कार्यक्रम, औषधं आणि पोषण मदत, यासारख्या योजनांमध्ये सेवा देण्यासाठी ही होऊ शकतो.