नवी दिल्ली : आणीबाणीत देशातील लोकशाही हिरावली. नागरिकांचे हक्क काढून घेण्यात आल्याचा पुनरोच्चार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. ते दुसऱ्या कार्यकाळातील पहील 'मन की बात'मध्ये बोलत होते. लोकसभा निवडणूक 2019 मध्ये मोठा विजय मिळाल्याबद्दलही त्यांनी जनतेचे आभार मानले.


महत्त्वाचे मुद्दे 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशाच्या पंतप्रधानांना जनता चिठ्ठी लिहिते पण स्वत:साठी काही मागत नाहीत. ही भावना देशासाठी खूप मोठी आहे. 



'मन की बात'मध्ये जी पत्र येतात त्यामध्ये लोक समस्यांचे वर्णन करतात. या वर्णनातून समस्यांचे निराकारण समाजव्यापी कसे असू शकते हे कळते. 


निवडणुकीच्या दरम्यान केदारनाथला का गेलात ?  असे प्रश्न अनेकांना पडले होते. प्रश्न विचारणे तुमचा हक्क आहे. तुमची जिज्ञासा देखील मी समजू शकतो. पण तिथे जाऊन मी स्वत:शी संवाद साधला.


देशाच्या हितासाठी 130 कोटी भारतीय सक्रियतेने जोडू इच्छित असल्याचे 'मन की बात' मधून सिद्ध होतं. 


आम्ही 'मन की बात'ची वाट पाहत आहोत असे खूप साऱ्या जणांनी पत्राद्वारे कळवले.