नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलवली आहे. या बैठकीला सुरुवात झाली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन हे देखील या बैठकीला उपस्थित आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोना व्हायरसवरील नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी या विषयावर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशातील सर्व मुख्यमंत्र्यांशी संवाद साधत आहेत. कोरोना लसीकरणाचा वेग वाढवणे तसेच निर्बंध वाढविण्याचा निर्णय या बैठकीत घेतला जाऊ शकतो.



बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, 'देशात कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढत आहे. अशा परिस्थितीत त्वरित उपाययोजना करणे आवश्यक आहे. देशात 9 कोटीहून अधिक लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. देशात 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी लसीकरण सुरू आहे, ते लवकर पूर्ण केले जावे.'


देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. त्यामुळे त्याला रोखण्याचं मोठं आव्हान सरकारपुढे असणार आहे. महराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. देशातील 10 राज्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग अधिक असल्याचं पुढे आलं आहे.