PM Modi meets school teacher: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) देशा-विदेशात कुठेही गेले तरी तिथल्या लोकांची ते आपुलकीने भेट घेतात, त्यांच्याशी बातचित करतात. नुकतेच पंतप्रधानांचे परदेशातील भारतीय नागरिकांच्या भेटीचे काही फोटो समोर आले होते. आता आणखी एक खास फोटो समोर आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या गुजरात दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी एका अशा व्यक्तीला भेट दिली, ज्याचे खास फोटो सध्या सोशल मीडियावर लोकांच्या पसंतीस उतरले आहेत. पंतप्रधान मोदी यांनी त्यांना लहानपणी शिकवलेल्या शिक्षकाची भेट घेतली.  


हात जोडून घेतले आशिर्वाद
पंतप्रधान मोदी सध्या गुजरात दौऱ्यावर असून त्यांनी आज अनेक प्रकल्पांचे उद्घाटन केले. यानंतर त्यांनी वडनगरमधील त्यांच्या शाळेतील शिक्षकांची भेट घेतली. ज्याचा फोटो व्हायरल झाला आहे. यामध्ये पीएम मोदी हात जोडून शिक्षकांना अभिवादन करत आहेत आणि शिक्षक त्यांच्या डोक्यावर हात ठेवून त्यांना आशीर्वाद देताना दिसत आहेत. 


या शिक्षकांचं नाव आहे जगदीश नाईक. ते वडनगरमधल्या शाळेत शिकवत असत. हा फोटो ट्विट करत केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी लिहिलंय, 'बलिहारी गुरु आपने..:


आपण शिकवलेला विद्यार्थी आज देशाच्या पंतप्रधानपदावर विराज आहे, आणि आशिर्वाद घेण्यासाठी आला आहे, यापेक्षा आनंदाचा दिवस एका शिक्षकासाठी कोणता असू शकतो, अशा प्रतिक्रिया लोक व्यक्त करतायत.