Narendra Modi Varanasi visit : दोन दिवसांच्या वाराणसी दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकास भारत संकल्प यात्रेत सहभाग घेतला. वाराणसी दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान मोदी लोकसभा मतदारसंघातील सेवापुरी गावात पोहोचले. येथील विकास भारत संकल्प यात्रेदरम्यान 'मेरी कहानी मेरी जुबानी' या कार्यक्रमात सहभागी झाले होते. प्रेक्षकांमध्ये बसून मोदींनी कार्यक्रम पाहिला. त्यावेळी काही महिलांना मोदींसमोर भाषण करण्याची संधी मिळाली होती. यावेळी एका भाषणाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. चंदा देवी नावाच्या महिलेने विकास योजनांवर आपली कहाणी सांगितली. या कहाणीने मोदींना प्रभावित केलं. त्यानंतर मोदींनी काय केलं पाहा...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विकास योजनांच्या लाभार्थी चंदा देवी यांनी शासकीय योजनांबाबत मनोगत व्यक्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचे भाषण लक्षपूर्वक ऐकत राहिले. त्यावेळी मोदींना चंदा देवी यांचं भाषण इतकं आवडलं की, मोदींनी त्यांना थेट निवडणूक लढवण्याची ऑफर दिली. तुम्ही निवडणूक लढवली आहे का? असा सवाल मोदींनी केला. यावर महिलेने सांगितले की, नाही मी कधीच निवडणूक लढवली नाही. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणखी एक प्रश्न विचारला.


तुम्हाला पुढील निवडणूक लढवायची इच्छा आहे का? असा सवाल नरेंद्र मोदी यांनी महिलेला विचारला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या प्रश्नाने अनेकांना आश्चर्य वाटलं अन् काहींना हसू देखील आलं. मला निवडणूक लढवायची नाही. आम्ही तुमच्यापासून प्रेरित आहोत, असं चंदा देवी यांनी सांगितलं. तुम्‍ही जे करण्‍याचा प्रयत्‍न करत आहात त्‍याशी आम्‍ही तत्पर राहण्‍याचा प्रयत्‍न करतो. यामुळेच आपण काही साध्य करू शकलो आहोत, असं चंदा देवी यांनी यावेळी सांगितलं.


पाहा Video



महिला तुमच्या बोलण्याला दाद देतील. तुमची मुले काय शिकतात? असा सवाल मोदींनी विचारला. माझी मुलगी सातवीत शिकते. मुलगा इयत्ता तिसरीत शिकत आहे, असं उत्तर महिलेने यावेळी दिलं. चंदा देवी जी, तुम्ही लखपती दीदी झाल्या. देशात दोन कोटी लखपती दीदी निर्माण करण्याचं आमचं स्वप्न आहे. जेव्हा ती तुमचं ऐकेल तेव्हा तिला विश्वास वाटेल की ती करोडपती बहीण बनू शकते, असं मोदींनी यावेळी म्हटलं आहे.