नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या फिलिपीन्स दौ-यावर रवाना झालेत. पंधराव्या दक्षिण पूर्व आशियाई राष्ट्रांच्या म्हणजेच आशियान शिखर परिषदेसाठी आणि बाराव्या ईस्ट आशिया परिषदेला मोदी उपस्थित राहणार आहेत. 


डोनाल्ड ट्रम्प यांची सोमवारी भेट होण्याची शक्यता


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


या दोन्ही परिषदांसोबतच सोमवारी पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची सोमवारी भेट होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान आशियानच्या व्यवसायात आणि गुंतवणुक परिषदेला उपस्थित राहतील. 


द्विपक्षीय बैठकीत सामील होतील


यासोबतच प्रधानमंत्री मोदी फिलिपीन्सचे राष्ट्राध्यक्ष रोडीनो डुपेरटे यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीत सामील होतील. 


रोडीनो हे आशियानचे विद्यमान अध्यक्ष आहेत. याच वेळी आशियानच्या 50 व्या वर्धापनदिनानिम्मित रोडीनो यांच्यातर्फे विशेष उत्सवाचे आयोजन करण्यात आलंय. भारत, अमेरिका, जापान आणि ऑस्ट्रेलिया यांचा एक संयुक्त गट तयार करण्याच्या प्रस्तावानंतर दोघांमधील ही पहिलीच बैठक असेल.