PM Modi Speech in Parliament LIVE Updates: : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या (UNION Budget 2023 India) कामकाजाचा आज सातवा दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi ) यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला उत्तर दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेरो शायरी करत भाषणाला सुरुवात केली. या शेरो शायरीतूनच पंतप्रधान मोदी यांनी काँगेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचे नाव न घेता  त्यांच्यावर निशाणा साधला.  उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांचने नाव घेत राहुल गांधी चांगलेच भडकले. अदानी श्रीमंतांच्या यादीत दोन नंबरवर कसे पोहोचले? असा सवाल उपस्थित करत राहुल गांधी यांनी एक फोटो दाखवला होता.  एका प्लेनमध्ये गौतम अदानी आणि नरेंद्र मोदी (Gautam Adani, Narendra Modi) दिसत आहेत. 


काही लोकांना देशाची प्रगती पहावत नाही


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देश प्रत्येक क्षेत्रात प्रगती करत आहे. नवीकरणीय ऊर्जेमध्ये भारत हा चौथा सर्वात मोठा देश बनला आहे.  मोबाईल उत्पादनात भारत दुसऱ्या क्रमांकाचा देश बनला आहे. खेळाडूंनी देखील जागतिक पातळीवर देशाचे नाव लौकिक वाढवला. भारताच्या प्रगतीचा डंका जगभरात वाजत आहे. मात्र, काही लोकांना देशाची प्रगती पहावत नाही असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर निशाणा साधला. ये कह कह कर हम दिल को बहला रहे हैं, वो अब चल चुके हैं, वो अब आ रहे हैं अशी शेरो शायरी करत मोदींनी विरोधकांना टार्गेट केले.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील महतत्त्वाचे मुद्दे


  • संकटापेक्षा मोठी 140 कोटी जनतेची शक्ती आहे.

  • मोठी महामारी, युद्धजन्य परिस्थिती, अनेक देशात अस्थिरतेची स्थिती, अनेक देशात महागाई...अशा परिस्थिती कोणता भारतीय व्यक्ती यावर अभिमान  करणार नाही... की भारत जगातला 5 वी मोठी अर्थव्यवस्था आहे.

  • भारताला जी 20 चं आयोजन करण्याची संधी मिळाली. ही 140 कोटी लोकांना अभिनान झाला. मात्र, काही लोक आहेत त्यांना वाईट वाटतं..

  • गेले काही दशक देशासाठी अस्थिरतेचे होते.

  • स्टेबल सरकार आहे.डिसेबल सरकार आहे..

  • एक पूर्ण बहुमताने चालणारी सरकार आहे...

  • रिफॉर्म आउट ऑफ कम्पल्शन नाही..रिफॉर्म आउट ऑफ कन्वशन होत आहेत..

  • तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात देशाने मोठ्या प्रमाणात प्रगती केली आहे. सप्लाय चेनमध्ये आपण मजबूत स्थितीत आहोत... काही लोकांना हे समजणार नाही

  • जग भारताच्या समृद्धीमध्ये आपली वृद्धी पाहत आहे..

  • निराशेतील लोकांना हे दिसत नाही..

  • भारत जगात स्टार्टअपच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे

  • मोबाईल निर्मितीत देश दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.

  • एअर ट्राफीकमध्ये भारत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.एनर्जी कन्झ्मशनमध्ये भारत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचले आहोत.

  • रिन्युबल एनर्जीमध्ये भारत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.

  • 'आगे पीछा देख कर क्यों होते गमगीन, जाकी जैसी भावना वैसी दिखे सीन'

  • दहा वर्षात महागाई दोन अंकी राहिली..त्यामुळं जर काही चांगलं झालं तर निराशा येतेच..

  • 100 वर्षातील सर्वात मोठी महामारी, युद्धाची परिस्थिती, जगाची फाळणी, या सारख्या मोठ्या संटकांचा देशाने सामना केला आहे.

  • कोरोना महामारीच्या काळात भारताने जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम राबवली. करोडो नागरिकांना मोफत लस पुरवल्या. 

  •  कोरोना काळात फक्त देशातच नाही तर भारताने जगातील 150 देशांमध्ये औषधे आणि लस पोहोचवली. 

  •  जगात अनेक देश आहेत, जे जागतिक स्तरावर भारताचे आभार मानतात. 

  •  भारत देश मोठ्या ताकदीने पुढे जात आहे. 

  •  जगातील मोठमोठे देश त्यांच्या कोविन लसीचे प्रमाणपत्र देऊ शकत नाहीत, परंतु भारतात मात्र, अवघ्या काही सेकंदात मोबाईलफोनवर लसीचे प्रमाणपत्र मिळत आहे.

  •  विरोधक नैराश्याच्या गर्तेत आहेत. यामुळेच ते देशाच्या प्रगतीविरोधात टीका करत आहेत.