नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आपले सोशल मीडिया अकाऊंट सोडण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त समोर येत आहे. याचे संकेत त्यांनी स्वत:ट्विट करुन दिले आहेत. येत्या रविवारी फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम आणि युट्यूब वरील अकाऊंट सोडण्याचा विचार करत असल्याचे ट्विट मोदींनी केले आहे. याबद्दल तुम्हाला अधिक माहिती देईन असेही आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले. 



पंतप्रधान मोदींनी सोशल मीडिया सोडण्याचे नेमकं कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. जगभरात सोशल मीडियात सर्वाधिक फॉलोअर्स असलेल्या नेत्यांपैकी पंतप्रधान मोदी हे आहे. मोदींचे ट्विटरवर ५३.३ दशलक्ष, इन्स्टाग्रामवर ३५.२ दशलक्ष आणि फेसबूकवर १४४ मिलियन फॉलोअर्स आहेत. दिल्लीमध्ये झालेल्या हिंसाचाराला सोशल मीडियावरच्या अफवांनी खतपाणी घातलं, त्यामुळे मोदी या निर्णयापर्यंत येऊन पोहोचले नाहीत ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे.