पंतप्रधान मोदी पुन्हा करणार देशाला संबोधित, कठोर निर्णय घेणार का याकडे लक्ष
पंतप्रधान मोदी कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावावर जनतेशी संवाद साधणार आहेत.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी संध्याकाळी पुन्हा एकदा देशाला संबोधित करणार आहेत. देशात कोरोना रुग्णांची वाढत आहेत. पंतप्रधान मोदी आज सायंकाळी 8 वाजता देशाला संबोधित करतील. याआधी १ मार्च रोजी पंतप्रधानांनी देशाला संबोधित केले आणि जनता कर्फ्यूची घोषणा केली होती. पंतप्रधानांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. यावेळी ते कोणता कठोर निर्णय़ घेतात का याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.
पंतप्रधान मोदींनी ट्विट केलं की, 'जागतिक महामारी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने मी देशवासीयांशी काही महत्वाच्या गोष्टीवर बोलेन. आज, 24 मार्च रात्री 8 वाजता देशाला संबोधित करेल.'
देशात कोरोना विषाणूच्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 500 वर पोहोचली आहे. आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. अशा परिस्थितीत केंद्र व राज्य सरकारतर्फे लॉकडाऊन जाहीर करण्यात आले असून बर्याच राज्यात कर्फ्यूही लागू करण्यात आला आहे.
दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात यासह देशातील एकूण 30 राज्यांनी पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले. याशिवाय घरातून बाहेर पडू नका अशा कडक सूचना लोकांना देण्यात येत आहेत. याशिवाय लॉकडाऊनचं उल्लंघन करणार्यांवर पोलिसांनी कायदेशीर कारवाई देखील सुरु केली आहे.
लॉकडाउनचे अनेक राज्यात उल्लंघन
कोरोना विषाणूमुळे देशातील 30 राज्यात लॉकडाउन घोषित करण्यात आले आहे. परंतु सोमवारी असे दिसून आले की लोकं रस्त्यावर येत आहेत आणि लॉकडाऊनचे उल्लंघन करत आहेत. स्वत: पंतप्रधानांनी ट्विट करून जनतेला लॉकडाऊन गंभीरतेने घ्यावे व राज्य सरकारला कायद्याचे पालन करवून घ्यावे असे आवाहन केले आहे.