नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त एक खास ट्वीट करून नारीशक्तीला प्रणाम केले आहे. मोदी ट्वीटमध्ये लिहीतात की, महिला दिनानिमित्त नारीशक्तीला शतशः प्रणाम. आम्हाला महिलांच्या यशावर अत्यंत अभिमान आहे. पुढे ते म्हणतात की,  नवी भारताच्या निर्मितीत महिलाशक्ती अग्रेसर आहे.


मोदींनी दिल्या खास शुभेच्छा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर दुसऱ्या ट्वीटमध्ये मोदी म्हणतात की, आपल्या अनेक आदर्श कामांमुळे इतिहासात महिलांनी मानवतेची छाप सोडली आहे. ही सर्व कामे येणाऱ्या पिढीला प्रेरणा देत असतात. मी तुम्हाला प्रेरणा देणाऱ्या काही महिलांबद्दल लिहायला सांगत आहे. #SheInspiresMe




राष्ट्रपतींनी केला महिलांचा गौरव


तर दुसरीकडे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रपती म्हणाले की, महिला कुटुंबासाठी आणि देशासाठी प्रेरणास्त्रोत असतात. पुढे ते म्हणाले की, भारत आणि संपूर्ण जगातील महिलांना आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा. महिला समाज्याला स्थिरता देतात. आपल्या कुटुंब आणि आपल्या देशासाठी त्या प्रेरणास्त्रोत आहेत. आपण असे काही विश्व निर्माण करूया ज्यामध्ये प्रत्येक महिला उज्ज्वल भविष्याची स्वप्ने बघतील आणि साकार करतील.