लक्षद्विप : ओखी चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या केरळ, तामिळनाडू आणि लक्षद्विपमधल्या भागांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भेट दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वादळामुळे नुकसान झालेल्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल आणि बेपत्ता मच्छिमारांचा शोध घेण्यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन पंतप्रधानांनी यावेळी दिलं.


या भेटीदरम्यान त्यांनी शाळकरी मुलांशी संवादही साधला. ज्यांचे पती बेपत्ता झालेत, अशा दोन महिला तमिळमध्ये पंतप्रधानांसमोर आपली व्यथा मांडत होत्या. भाषा कळत नसली, तरी मोदींनी शांतपणे त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. त्यानंतर केरळची राजधानी थिरुवनंतपुरममध्ये मोदींनी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन मदत आणि पुनर्वसन कार्याचा आढावा घेतला.