रामराजे शिंदे, झी मीडिया, नवी दिल्ली : लॉकडाऊन उठवले तर गंभीर परिणाम दिसून येतील असं वक्तव्य जागतिक आरोग्य संघटनेने केल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी लॉकडाऊनच्या शेवटच्या दिवशी काय बोलणार ? याकडे सर्व देशाचे लक्ष लागले आहे. यापूर्वी जान है तो जहान है असा नारा मोदींनी दिला होता कर यावेळी 'जान भी और जहान भी' असा नारा दिला जाणार आहे. जीव तर महत्त्वाचा आहेत परंतु त्यासोबत अर्थव्यवस्था रूळावर आणण्यासाठी काही पावले उचलली जाऊ शकतात का याकडे लक्ष आहे.


महत्त्वाचे मुद्दे कोणते ?


१. काही भाग वगळून लॉकडाऊन घोषित केले जाऊ शकते. विशेषत: ज्या भागात कोरोनाचा रुग्ण नाही तिथे जनजीवन आणि उद्योग सुरळीत आणण्यावर भर असेल.

 

२. वस्त्रोद्योग, ॲटोमोबाईल्स आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात खबरदारी घेऊन सुरू करण्याचे संकेत दिले जाऊ शकतात.

 

३. कृषी क्षेत्र आणि जीवनावश्यक वस्तूंना लॉकडाऊनमधून वगळल्याचा निर्णय जाहीर करू शकतात. 

   

४. केंद्रीय कर्मचाऱ्यांना कामावर रूजू राहण्यासंदर्भात सूचना देऊ शकतात.

 

५. लॉकडाऊन उठविण्याचा निर्णय राज्यावर सोपवला जाऊ शकतो.

 

६. जगभरात भयावह परिस्थिती आहे. त्यामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषित केले जाऊ शकते.

 

७. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त देशाला संबोधित करण्याची शक्यता.