रामराजे शिंदे, झी मीडिया, नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी लोकसभा आणि राज्यसभेतील सर्व पक्षांच्या प्रमुखांशी संवाद साधणार आहेत. आज सकाळी ११ वाजता व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ही बैठक होईल. शिवसेनेचे राज्यसभेतील गटनेते संजय राऊत आणि लोकसभा गटनेते विनायक राऊत या बैठकीला उपस्थित असतील.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोदीजी, सैन्यच उपाशी असेल तर लढायचे कसे?- शिवसेना

या नेत्यांकडून पंतप्रधान मोदी यांच्यासमोर दोन महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले जातील. पंजाबमधील गहू महाराष्ट्रात आलेला नाही. त्यामुळे महाराष्ट्रात अन्नधान्याची कमतरता निर्माण झालेली आहे. तसेच कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्राला आणखी आर्थिक मदत पुरवली जाण्याची गरज असल्याचे यावेळी शिवसेनेकडून सांगण्यात येईल. त्यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यावर काय प्रतिक्रिया देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. दरम्यान, ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने या बैठकीवर बहिष्कार टाकला आहे. 

काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याशीही फोनवरून चर्चा केली होती. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी संवाद साधला होता. 


कोरोनाचं सोडा, माणुसकीच संपतेय; मुंबईतील घटनेने तुम्हाला धक्काच बसेल

सध्याच्या घडीला महाराष्ट्र हे देशातील कोरोनाग्रस्तांची सर्वाधिक संख्या असलेले राज्य आहे. चिंतेची बाब म्हणजे देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत कोरोनाचा मोठ्याप्रमाणावर प्रादुर्भाव होताना दिसत आहे. मुंबईतील पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा ५००च्या वर पोहचला असून त्यात वरळी परिसरात सर्वाधिक ७८ रुग्ण सापडले आहेत.