नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज फ्रान्सच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर रवाना झालेत. पंतप्रधान मोदी विविध मुद्द्यांवर फ्रान्सचे अध्यक्ष ईमॅन्यूएल मॅक्रॉन यांच्याशी चर्चा करतील. सामरिक सहकार्य, संरक्षण, अणूउर्जा, सागरी सहकार्य, दहशतवादविरोध अशा विविध मुद्द्यांवर भारत फ्रान्स यांच्यात चर्चा होणार आहेत. फ्रान्समधल्या भारतीय नागरिकांच्या कार्यक्रमातही पंतप्रधान सहभागी होतील. 


ट्विटरवर माहीती 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फ्रान्समधील भेटीनंतर पंतप्रधान मोदी २३ आणि २४ ऑगस्टला युएई दौऱ्यावर असतील तर २४ आणि २५ ऑगस्टला बहारीन दौऱ्यावर जाणार आहेत. युएई आणि बहारीनमधील दौऱ्यानंतर पंतप्रधान मोदी पुन्हा फ्रान्सला जी ७ परिषदेत रवाना होणार आहेत. दरम्यान मोदींनीही ट्विट करत आपल्या पुढील कार्यक्रमांची माहिती दिली आहे. 


न्यूयॉर्क दौऱ्यात निदर्शने


पंतप्रधान नरेंद्र मोदी न्यूयॉर्क दौऱ्यावर असताना तिथे पाकिस्तानतर्फे निदर्शन केली जाणार असल्याचे वृत्त समोर येत आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी यासंदर्भातील सूचना दिल्या आहेत. पाकिस्तान सत्तेत असलेल्या तहरीक-ए-इंसाफ संघटना न्यूयॉर्कमध्ये पंतप्रधान मोदींना विरोध दर्शवेल असेल असे ते म्हणाले.  जम्मू आणि काश्मीर येथून अनुच्छेद ३७० हटवण्याच्या पंतप्रधान मोदींच्या निर्णयावर सरकार पाकिस्तानचे सरकार नाराज आहे. 



इम्रान खान यांनी आपल्या पार्टीच्या कार्यकर्त्यांना आणि परदेशात राहणाऱ्या आपल्या समर्थकांना काश्मीरचा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्याचे आवाहन केले आहे. पाकिस्तानात सत्तेत असलेल्या तहरीक-ए-इंसाफ संघटनेने हा मुद्दा जगासमोर न्यायचे ठरवले आहे. न्यूयॉर्कमध्ये विरोध दर्शविण्यासाठी पीटीआयच्या विदेशी संघटनांना निर्देश जारी करण्यात आले आहेत.