नवी दिल्ली :  पीएम किसान योजनेचा (PM Kisan Samman Nidhi) लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांचा आकडा हा 10 कोटींच्या पार गेला आहे. केंद्र सरकारने (Central government) सोमवारी याबाबतची माहिती दिली. या योजनेचा पहिला हफ्ता 2019 मध्ये देण्यात आला होता. तेव्हा लाभार्थ्यांचा आकडा हा 3 कोटी 16 लाख इतका होता. त्यानुसार आता लाभार्थ्यांचा आकड्यात तिप्पट वाढ झाली आहे. (pmksn pm kisan samman yojana big update from central government know details)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या योजनेनुसार, लाभार्थ्यांच्या खात्यात दरवर्षी 6 हजार रुपये पाठवले जातात. याबाबतची घोषणा फेब्रुवारी 2019 मध्ये करण्यात आली होती. मात्र डिसेंबर 2018 पासून लागू करण्यात आलं आहे. "या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्यांची संख्या ही 10 कोटी इतकी झाली आहे, जी सुरुवातीला 3 कोटी 16 लाख इतकी होती", अशी माहिती कृषी मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. 


किती कोटींची मदत


या योजनेअंतर्गत 3 पेक्षा अधिक वर्षांच्या कालावधीत लाभार्थ्यांना 2 लाख कोटींपेक्षा अधिक आर्थिक मदत देण्यात आली आहे. योजनेच्या हफ्त्याची रक्कम ही लाभाऱ्थ्यांच्या खात्यात पाठवली जाते. केंद्र सरकारने या योजनेनुसार, 12 हफ्ते दिले आहेत.