मुंबई :  PNB ग्राहकांसाठी मोठी बातमी आहे. बँकेने पुन्हा एकदा बचत खात्यावरील व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेतला असून ही माहिती देताना बँकेने म्हटले आहे की 10 लाख रुपयांपेक्षा कमी शिल्लक असलेल्या बँक खात्यांसाठी व्याज दर वार्षिक 2.70 टक्के करण्यात आला आहे. 


PNB ग्राहकांना धक्का


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पीएनबीने आपल्या वेबसाइटवर नोटीस जारी करून म्हटले आहे की, 10 लाख रुपयांपेक्षा कमी शिल्लक असलेल्या बँक खात्यांसाठी व्याज दर वार्षिक 2.70 टक्के करण्यात आला आहे. या निर्णयानंतर 10 लाख रुपयांच्या मर्यादेत येणाऱ्या ग्राहकांना थेट फटका बसणार आहे.


पंजाब नॅशनल बँक स्टेट बँक ऑफ इंडियानंतर सार्वजनिक क्षेत्रातील दुसरी सर्वात मोठी बँक आहे. 


दोन महिन्यांत दुसऱ्यांदा कपात


विशेष म्हणजे अवघ्या दोन महिन्यांत बँकेने दुसऱ्यांदा ही कपात केली आहे. यापूर्वी फेब्रुवारी 2022 मध्ये बँकेने व्याजदरात कपात केली होती.


फेब्रुवारीमध्ये 10 लाख रुपयांपर्यंत शिल्लक असलेल्या खात्यांसाठी 2.75 टक्के आणि 10 लाख रुपयांपासून ते 500 रुपयांपेक्षा कमी बचत खात्यांसाठी 2.80 टक्के व्याजदर होता. म्हणजेच या निर्णयानंतर दोन्ही प्रकारच्या खात्यांवरील व्याजदरात एकूण .0.5 टक्के कपात करण्यात आली.