नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बॅंकेला ११,४०० कोटी रूपयांचा चूना लावणा-या नीरव मोदी आणि काही अन्य लोकांविरोधात २८० कोटी रूपयांच्या मनी लॉंड्रिंगच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी ईडीने छापेमारी केली. ईडीने मुंबई, दिल्ली आणि गुजरातमध्ये छापेमारी केली. 


मोदीची इतकी संपत्ती जप्त


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ईडीने केलेल्या छापेमारीत तब्बल ५,१०० कोटी रूपयांचे हिरे आणि सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. ईडीने नीरव मोदीच्या १७ ठिकाणांवर छापेमारी केली. ही कारवाई पंजाब नॅशनल बॅंकेच्या तक्रारीनंतर केली गेली. एजन्सीने नीरव मोदी, त्याची पत्नी एमी, भाऊ विशाल आणि उद्योगपती मेहुल चौकसी यांच्या विरोधात मनी लॉंड्रींगची तक्रार दाखल केलीये. 



कुठे केली कारवाई



सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तडकाफडकी सुरू झालेल्या कारवाईत मुंबई, गुजरात आणि दिल्लीतील कमीत कमी दहा जागांवर छापेमारी केलीये. यात मोदीचं मुंबईच्या कुर्लातील घर, काला घोडा येथील डिझायनर ज्वेलरी दुकान, बांद्रा आणि लोअर परेलमधील कंपनीच्या कार्यालयातील तीन ठिकाणांवर, गुजरातच्या सूरतमधील तीन ठिकाणे आणि दिल्लीच्या डिफेंस कॉलनी आणि चाणक्यपुरी परीसरातील मोदीच्या शो-रूमचाही समावेश आहे.