नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बॅंक (पीएनबी) मध्ये ११,३०० कोटीचा घोटाळा समोर आल्यानंतर सरकारने शुक्रवारी नीरव मोदी आणि मेहुल चिनूभाई चोकसी यांचे पासपोर्ट ४ आठवड्यांसाठी निलंबित केले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तसेच पंतप्रधान मोदी आणि नीरव मोदी यांची भेटच झाली नसल्याचा दावाही करण्यात आलायं. 


ट्विटर पोस्ट 



सोशल मीडियावर एक फोटो वायरल होतोयं. कॉंग्रेस नेते राजबब्बर यांनी आपल्या ट्विटर हॅंडलवरू एक व्हिडिओ शेअर केलायं. ज्यामध्ये पंतप्रधान मोदी घोटाळ्यातील आरोपी मेहुल चौकसी याचे नाव घेताना दिसत आहेत. 


राहुल गांधी आणि नीरव मोदी संबंध ? 


राहुल गांधी आणि नीरव मोदी यांच्या मुलाखतीच्या बातम्याही चर्चेत राहिल्या.


पीएनबी घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदी आणि राहुल गांधी यांचे नजीकचे संबंध आले असून त्यांची अनेकदा भेट झाल्याचा आरोप कधीकाळी कॉंग्रेसमध्ये असणार्या शहजाद पूनावाला यांनी केलेयतं.


त्यामुळे नीरव मोदींच्या नक्की जवळ कोणं आहे ? हे सांगणे कठीण आहे.