शिमला : हिमाचल प्रदेशमध्ये आपल्या पक्षाच्या पराभवाची समिक्षा करण्यासाठी राहुल गांधी यांची बैठक होती. या बैठकीत सामिल होण्यासाठी आलेल्या महिला आमदाराने पोलिसाला कानशिलात लगावली.


महिला आमदाराच्या कानाखाली लगावली


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र याला उत्तर म्हणून एका महिला पोलिसांनेही महिला आमदाराच्या कानाखाली लगावली आहे. महिला आमदार आणि महिला पोलिस यांच्यात हे थापट मारणे बराच वेळ चाललं.



एकमेकांना श्रीमुखात लगावल्या


राहुल गांधी यांच्या बैठकीत डलहौजीच्या काँग्रेस महिला आशा कुमारी आमदार जात होत्या, त्यावेळेस त्या महिला आमदाराला, एका महिला पोलिसाने त्यांना अडवलं, या वादातच त्यांनी एकमेकांना श्रीमुखात लगावल्या.


कुणावरही गुन्हा दाखल नाही


या वादानंतर कुणीही कुणावरही गुन्हा दाखल केलेला नाही. महिला कॉन्स्टेबलने काँग्रेसच्या महिला आमदार आशा कुमारी यांना खूप समजावण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी ऐकलं नाही, तेव्हा संतापात महिला आमदाराने, महिला कॉन्स्टेबलला कानात मारली, क्षणाचा बिलंब ही न करता, आमदाराच्याही कानात मारली


आमदाराने माफी मागितली, पण


हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यावर आशा कुमारी यांनी माफी मागितली आहे. मात्र महिला पोलिसाने मला शिव्या दिल्या, मी तिच्या आईच्या वयाची आहे, तिने स्वत:वर कंट्रोल करायला हवा होता,  हो आणि मी मानते की मी संयम सोडायला नको होता, मी माफी मागते'.