भोपाळ : कमलनाथ सरकारमधील माजी वनमंत्री आणि आमदार उमंग सिंघार यांच्या बंगल्यात एका 39 वर्षाच्या महिलेने फाशी लावून आत्महत्या केली. ही महिला उमंग सिंघार यांची गर्लफ्रेंड असल्याचं बोललं जात आहे. पोलिसांनी या प्रकरणार काँग्रेस आमदार सिंघार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महिलेचं नाव सोनिया भरद्वाज असल्याचं कळतं आहे. पोलिसांनी सिंघार यांच्या विरुद्ध महिलेला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. सोनिया यांचा मुलगा आर्यन आणि घरात काम करणाऱ्या व्यक्तींचा जबाब पोलिसांनी नोंदवला आहे. ज्यामध्ये दोघांमध्ये वाद होत असल्याचं समोर आलं आहे. 


लग्न करणार होते दोघं
पोलिसांच्या माहितीनुसार, सिंघार हे सोनिया भारद्वाज यांच्यासोबत विवाह करणार होते. दोघांची ओळख एका मॅट्रिमोनियल वेबसाईटवर झाली होती. सोनिया यांनी आपल्या पहिल्या पतीला सोडून दुसरं लग्न केलं. पण ते देखील टिकलं नाही. सोनिया सिंघार यानंतर तिसरं लग्न करणार होत्या. पण हा विवाह कधी होणार होता. याबाबत काहीही माहिती पुढे आलेली नाही.


सुसाईट नोट


महिलेने एक सुसाईट नोट देखील लिहिली आहे. जी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. ज्यामध्ये असे लिहिले आहे की, तुम्ही खूप रागीट स्वभावाचे आहात, आता सहन नाही होत.' पण यामध्ये महिलेने आत्महत्येसाठी कोणालाही जबाबदार ठरवलेलं नाही. महिलेच्या आत्महत्येनंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. सध्या पोलीस याचा अधिक तपास करत आहे.


काँग्रेस आमदार उमंग सिंघार यांच्या बंगल्यावर ही महिला राहत होती. पोलीस अधिकारी राजेश भदौरिया यांनी सांगितलं की, 'सोनिया भारद्वाज असं या महिलेचं नाव असून ती अंबालाच्या बलदेव नगरची राहणार आहे. महिलेचं वय 39 वर्ष आहे. गेल्या 25 दिवसांपासून ती या बंगल्यात राहत होती. याआधी देखील ती येथे आली होती. महिलेच्या नातेवाईकांना याबाबत माहिती दिली आहे. पोस्टमॉर्टम झाल्यानंतर मृतदेह परिवाला सोपवण्यात येईल.'


आमदार उमंग सिंघार यांनी म्हटलं की, 'सोनिया माझी चांगली मैत्रीण होती. ती नेहमी येथे राहायची. मी 3 दिवसापासून माझ्या मतदारसंघात होतो. जेथे कोरोनाग्रस्तांना मदत करत होतो. या घटनेनंतर मला ही धक्का बसला आहे. माहिती मिळताच मी येथे आलो.'