नवी दिल्ली : डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम याची कथित दत्तक मुलगी हनीप्रीतबद्दल पोलिसांच्या चौकशीत अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्यात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या पोलिसांच्या ताब्यात असलेली हनीप्रीत सिंग करोडोंच्या संपत्तीची मालकीण आहे. हरियाण पोलिसांना सापडलेल्या एका बॅगेत ठेवलेल्या कागदपत्रांवरून हे स्पष्ट झालंय. फरार झाल्यानंतर हनीप्रीतनं ही कागदपत्रं आणि बँक खात्यांची असलेली कागदपत्रं राजस्थानच्या गुरुसर मोडियामध्ये लपवून ठेवले होते. या कागदपत्रांच्या साहाय्यानं पोलीस हनीप्रीतच्या नावावर असलेल्या संपत्तीची माहिती घेत आहेत.


मोबाईल फोनही पोलिसांच्या हाती लागलेल्या या कागदपत्रांच्या साहाय्यानं हनीप्रीत करोडोंची मालकीण असल्याचं उघड होतंय. या बॅगमधून डेबिट कार्ड, शैक्षणिक पदव्याही सापडल्यात.


सर्वात महत्त्वाचं म्हणजं, हनीप्रीतचा आयफोनही पोलिसांच्या हाती लागलाय. परंतु, या आयफोनमधला डाटा डिलीट करण्यात आलाय. अशामध्ये पंचकूलाच्या हिंसेसंबंधी माहिती मिळवण्यात पोलिसांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.