Supermodel Eksha Kerung Viral Video : काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक पाकिस्तानी मुलीचा लता मंगेशकर यांच्या गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर ती मुलगी सोशल मीडियावर एका रात्रीच स्टार झाली. ज्या गाण्यावर त्या मुलीनं डान्स केला होता ते 1954 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'नागिन' या चित्रपटातील गाणं असून त्याचं हे रिमिक्स व्हर्जन आहे. तर मॉडेलिंगसाठी ओळखली जाणारी एक्शा केरुंगनेही या गाण्यावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. खरंतर एक्शा ही मॉडेल असून सिक्किम पोलिसात तैनात आहे. नॉर्थ ईस्टच्या एक्शाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ एक्शानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत एक्शा निसर्गरम्य ठिकाणी नाचताना दिसत आहे. एक्शानं यावेळी तिचा पोलिस युनिफॉर्मही परिधान केला आहे. एक्शा हा रील व्हिडीओ करताना व्हायरल रीलप्रमाणे त्याच स्टेप्स करत आहे. दरम्यान, एक्शाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. एक्शाचा फक्त हा व्हिडीओ नाही तर तिचं मॉडेलिंगचे फोटो देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसतात. 


पाहा व्हायरल व्हिडीओ -


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


हेही वाचा : Arjun Kapoor सोबत लग्न करण्याआधीच Malaika Arora करतेय Divorce च्या गोष्टी, असं का?


एक्शानं शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला असून 3 लाख पेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाइक केलं आहे. तर हा व्हिडीओ 5 मिलियन पेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. हा व्हिडीओ शेअर करत No offence असे कॅप्शन एक्शानं दिलं आहे. एक्शाचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर अनेक कमेंट केल्या आहेत. एक्शा ही फक्त पोलिस ऑफिसर नाही तर ती एक मॉडेल देखील आहे. एक्शा MTV Super Model मध्ये सहभागी झाली होती आणि ती या शोची विजेती देखील ठरली होती.