कानपूर : नोटाबंदीच्या तब्बल १४ महिन्यांनंतर यूपीच्या कानपूर जिल्ह्यातील एका परीसरात करोडो रूपयांच्या जुन्या नोटा सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. 


पोलिसांची छापेमारी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलीस आणि एनआरएच्या टीमने गेल्या मंगळवारी रात्री कानपूरच्या तीन-चार हॉटेल्स आणि इमारतींमध्ये छापेमारी केली. त्यानंतर स्वरूप नगर परिसरात एका घरात पोलिसांना करोडो रूपयांच्या जुन्या नोटा मिळाल्या. 


पोलीस थक्क



छापा टाकल्यावर पोलीस वेगवेगळ्या रूम्समध्ये जुन्या नोटांच्या गाद्या पाहून थक्क झाले. याप्रकरणी पोलिसांनी १६ लोकांना ताब्यात घेतलं आहे. एनआयएकडून माहिती मिळाल्यावर कानपूर पोलिसांनी छापा टाकला. 


किती आहे रक्कम?


एसएसपी अखिलेश मीणा यांच्यानुसार, जुन्या नोटा मोजण्याचं काम सुरू आहे. पण अंदाज आहे की ही रक्कम ९० ते १०० कोटी रूपयांची असू शकते. याची घोषणा नंतर केली जाईल. 


दहशतवादाशी संबंध नाही


या प्रकरणाशी दहशतवाद्यांचा संबंध नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. पोलिसांनी मुख्य आरोपी आनंद खत्री श्रीमंत परिवारातील आहे. तो नोटाबंदी झाल्यापासूनच २० ते २५ टक्क्यांच्या बदल्यात जुन्या नोटा बदलून देतो असे सांगत होता. मात्र तो हे पैसे बदलवू शकला नाही. त्यामुळे इतकी रक्कम जमा झाली.