Maha Kumbh Stampede: उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीत 30 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती या भव्य धार्मिक मेळाव्याच्या सुरक्षेची देखरेख करणाऱ्या पोलिस प्रमुखांनी आज प्रसारमाध्यमांना दिली. मृतांमधील 25 जणांची ओळख पटली, इतर 5 जणांची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरु आहे. तसंच 60 जण जखमी असून अनेकांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस अधिकारी वैभव कृष्णा यांनी दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चेंगराचेंगरी झाल्यानंतर स्थानिक रिपोर्ट आणि प्रयागराजमधील नागरिकांकडून मृतांच्या आकड्यासंदर्भात वेगवेगळे दावे केले जात होते. यामुळे सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं होतं. यानंतर अखेर प्रशासनाने अधिकृतपणे मृतांचा आकडा जाहीर केला आहे. 


महाकुंभमेळा प्रशासनाचे डीआयजी वैभव कृष्णा म्हणाले की, काही भाविक बॅरिकेड्स तोडून पुढे जाण्याच्या प्रयत्नात होते. यावेळी काही भाविक झोपलेले होते जे चिरडले गेले. डीआयजी म्हणाले की तिथे कोणताही व्हीआयपी प्रोटोकॉल नव्हता. जखमींच्या माहितीसाठी 1920 हा हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यात आला आहे.


प्रयागराज महाकुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीत 90 जण जखमी झाले होते, त्यापैकी 30 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांपैकी 25 जणांची ओळख पटली आहे अशी माहिती मेळा प्रशासनाने पत्रकार परिषदेत अधिकाऱ्यांनी दिली आहे. कर्नाटकातील चार आणि गुजरातमधील एका भाविकाचीही ओळख पटली आहे.


नेमकं काय घडलं? 


मौनी अमावस्येनिमित्त महाकुंभ मेळ्यामध्ये गंगेमध्ये पवित्र स्नान करण्यासाठी म्हणून अनेकांनीच संगमाच्या दिशेनं धाव घेतली. यादरम्यान पोल क्रमांक 90 ते 118 मध्ये एकच गोंधळ माजला तिथं यावेळी मोठ्या संख्येनं नागरिकांची उपस्थिती होती. प्रथमदर्शींच्या माहितीनुसार बॅरिकेड उघडल्यानंतर एकाएकी लोकांचा लोंढा नियंत्रणाबाहेर गेला आणि इथं चेंगराचेंगरी झाली.


यंदाच्या वर्षी फक्त 2 अमृत स्नान? 


महाकुंभ मेळ्यात चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर आखाडा परिषदेनं मोठा निर्णय घेत यंदाच्या वर्षी फक्त दोन अमृत स्नानं असतील असं स्पष्ट केलं होतं. यापैकी पहिलं अमृत स्नान 14 जानेवारी रोजी पार पडलं असून, दुसरं अमृत स्नान 3 फेब्रुवारी रोजी वसंत पंतमीचा पार पडणार आहे. पण नंतर हा निर्णय रद्द करण्यात आला.


महाकुंभ मेळ्याच क्षमतेहून अधिक गर्दी झाल्यामुळं संगमावर येऊन पवित्र स्नान करण्याचा आग्रह सोडत जिथं गंगा आहे तिथं हे स्नान करावं असं आवाहन महाकुंभमेळ्यातील महंतांनी केलं आहे.