नवी दिल्ली : पोलीस बारबालांसोबत नाचतानाचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. 


(व्हिडिओसाठी खाली स्क्रोल करा)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर प्रदेशातील गोंडामध्ये बारबालांसोबत ठुमके लगवणाऱ्या पोलिसांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ही घटना समोर आल्यानंतर पोलीस अधीक्षकांनी संबंधित पोलिसांचं निलंबन केलं आहे. तसेच घटनेची चौकशी सुरु केली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, धानपूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या लखनीपूर परिसरात एका कार्यक्रमासाठी बारबालांना बोलावलं होतं. या कार्यक्रमात पाहूण्यांसोबतच पोलिसांनीही उपस्थिती लावली.


कार्यक्रमानंतर जेवणाचा कार्यक्रम पार पडला आणि त्यानंतर सुरु झाला डान्स कार्यकम. या कार्यक्रमानंतर बारबालांचा डान्स पाहून तेथे उपस्थित असलेले पोलीस कर्मचारी बारबालांजवळ गेले. त्यानंतर त्यांनी चक्क बारबालांसोबत डान्स केला. इतरकंच नाही तर त्यांनी बारबालांवर पैशांचा पाऊसही पाडला.


पोलीस कर्मचारी बारबालांवर पैशांचा पाऊस पाडत असल्याचं व्हिडिओत पहायला मिळत आहे. या दरम्यान, तेथे उपस्थित लोकांनी व्हिडिओ शूट केला आणि त्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल झाला.



या घटनेनंतर पोलीस अधीक्षकांनी संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित केले असून चौकशी सुरु केली आहे. तसेच चौकशी अहवाल आल्यानंतर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.