पाटणा : बिहारमधील या नाट्यमय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्येही बैठकांचा सिलसिला सुरु झाला आहे. नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली भाजप संसदीय दलाची बैठक सुरु आहे. या बैठकीत बिहारमधील घडामोडींवर चर्चा होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसरीकडे पाटण्यातही भाजपची महत्त्वाची बैठक पार पडली. सुशील मोदी यांच्या उपस्थितीत भाजपच्या विधीमंडळ दलाची बैठक संपन्न झाली. भाजपला मध्यावधी निवडणुका नकोत असं विधान बिहार भाजपचे नेते सुशील मोदी यांनी केलंय.


 नितीश कुमार यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन त्यांचं अभिनंदन केलंय. भ्रष्टाचाराविरोधातील लढाईला साथ दिल्याबद्दल मोदींनी नितीश यांचे ट्विटरवरुन आभार मानलेत. त्यामुळे बिहारमध्ये जेडीयू आणि भाजप एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगल्यात.


दरम्यान, बिहारच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. यावर संयुक्त जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांनी नितीश कुमार यांच्यावर निशाणा शाधलाय. भाजप आणि संघाचे सेटींग, त्यामुळे नितीश कुमारांनी राजीनामा दिला, असा थेट हल्लाबोल लालूप्रसाद यांनी केलाय.


नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलाय. जेडीयू विधिमंडळ दलाच्या बैठकीनंतर नितीश कुमार यांनी राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांची भेट घेऊन आपल्या पदाचा राजीनामा सोपवलाय. सध्याच्या वातावरणात सरकार चालवणं कठीण झाल्याचं सांगत नितीश कुमार यांनी राजीनामा सोपवला. 


आरजेडीचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी चर्चा केली होती. मात्र कोणताही ठोस निर्णय घेतला जात नसल्यानं आपली घुसमट होत असल्याचं नितीश यांनी सांगितलं. संकट आल्याचं सांगत लालू यांनी संरक्षण मागितलं. मात्र हे ओढवून घेतलेलं संकट असल्यामुळं संरक्षणाचा प्रश्नच उदभवत नसल्याचं सांगत नितीश यांनी लालूंवरील आरोपांना पुष्टी दिली. भाजपसोबत जाण्याच्या मुद्यावरही त्यांनी भूमिका स्पष्ट न करता पुढं काय घडतं ते पाहा असं सांगत सूचक वक्तव्य केलं.