मुंबई : देशात पहिल्यांदा मध्य प्रदेशच्या भोपाळमधील एम्स (AIIMS) कोरोना व्हायरस संक्रमित असलेल्या मृतदेहाचं पोस्टमार्टम करण्यात आलं आहे. कोरोनाचा शरीरावर नेमका काय परिणाम होतो हे जाणून घेण्यासाठी पोस्टमार्टम करण्यात येणार आहे. आतापर्यंत परदेशात झालेल्या संशोधनावर कोरोनाबाधितांवर उपचार केले जात होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय आर्युविज्ञान अनुसंधान परिषद (ICMR) कडून परवानगी मिळाल्यानंतर भोपाळमधील AIIMS ने केलेल्या संशोधनात संक्रमित मृतदेहाचे पोस्टमार्टम करण्यात आले. संशोधनात भोपाळमधील AIIMS मध्ये जवळपास १० कोरोनाबाधित मृतदेहांचे पोस्टमार्टम केले आहे. 


परदेशात झालेल्या संशोधनातून समोर आलं आहे की, कोरोना संक्रमित रुग्णांच्या हृदयावर, मेंदूवर आणि फुफ्फुसावर परिणाम होतो. भारतात कोरोनाबाधितांच्या शरीरावर या व्हायरसचा परिणाम काय होतो याबाबत काहीच कल्पना नाही. याकरता संशोधन करण जास्त गरजेचं आहे. 


भोपाळमधील AIIMS च्या संचालकांनी दिलेल्या माहितीनुसार, AIIMS च्या प्रमुख कमिटीने कोरोना संक्रमित मृतदेहाचे पोस्टमार्टम करण्यास अनुमती दिली आहे. आतापर्यंत ही माहिती समोर आलेली नाही की, कोरोनामुळे रुग्णाच्या कोणत्या शरीराच्या अवयवावर परिणाम होतो याची माहिती मिळाली आहे. या संशोधनानंतर डॉक्टरांना माहिती मिळेल की, कोरोनाचा शरीराच्या कोणत्या अवयवावर परिणाम होतो. 



या संशोधनामुळे कोरोनाबाधितांचा मृत्यूदर कमी होण्यास मदत होईल. जोपर्यंत व्हॅक्सीन मिळत नाही तोपर्यंत यावर उपाय शोधणं गरजेचं आहे. रुग्णांच्या शरीरातील अवयव निकामी होण्यापासून रोखण्यास मदत केली पाहिजे.