पैशांचा पाऊस, कमी कालावधीत दुप्पट फायदा, Post Office च्या `या` योजनांमध्ये गुंतवा रक्कम
पोस्ट ऑफीसच्या ( Post Office) योजनांमध्ये गुंतवणूक करणं सुरक्षित मानलं जातं.
मुंबई : पोस्ट ऑफीसच्या ( Post Office) विविध योजनांमध्ये गुंतवणूक करणं सुरक्षित मानलं जातं. जर तुम्हीही गुंतवणूक करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी काही खास योजना आहेत. पोस्टाच्या विविध योजनांमध्ये गुंतवणुकीमुळे कोणत्याही प्रकारे नुकसान होण्याचा धोका नसतो. तसेच सरकारने सप्टेंबरच्या तिमाहीत छोट्या योजनांमधील व्याज दरात कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे पोस्टाच्या या 8 योजनांमध्ये पैसे गुंतवल्यास तुम्हाला कमी कालावधीतच दुप्पट रक्कम मिळेल. कमी कालावधीत दुप्पट फायदा मिळवून देणाऱ्या या कोणत्या योजना आहेत, हे आपण जाणून घेऊयात. (post office 8 best schemes pay double amount in less time know details)
1 पोस्ट ऑफीस टाईम स्कीम (post office time deposit scheme)
1 ते 3 वर्षांच्या कालावधीसाठी पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट स्कीममध्ये 5.5%व्याज मिळत आहे. जर तुम्ही यात गुंतवणूक केली तर तुम्ही गुंतवलेली रक्कम ही 13 वर्षात दुप्पट होईल. तसेच तुम्हाला 5 वर्षांच्या ठेवीवर 6.7% व्याज मिळत आहे. जर या व्याजदरासह पैसे गुंतवल्यास रक्कम 10.75 वर्षात दुप्पट होतील.
2 Post Office सेविंग बँक अकाउंट (Post Office Savings Bank Account)
जर तुम्ही तुमचे पैसे पोस्ट ऑफिस बचत खात्यात ठेवले तर रक्कम दुप्पट होण्यासाठी बराच काळ वाट पाहावी लागेल. कारण खात्यातील रक्कमेवर दरवर्षी फक्त 4.0 टक्के दरवर्षी व्याज मिळेल. म्हणजेच तुमची जमा रक्कम 18 वर्षात दुप्पट होईल.
3 पोस्ट ऑफीस रिकरिंग डिपॉझिट (Post Office Recurring Deposit)
पोस्ट ऑफीस रिकरिंग डिपॉझिट या योजनेत गुंतवणूक केल्यास 5.8% व्याज मिळेल. या व्याजदराने पैसे गुंतवले तर रक्कम 12.41 वर्षात दुप्पट होईल.
4. पोस्ट ऑफीस मासिक उत्पन्न योजना (Post Office Monthly Income Scheme)
पोस्टाच्या या योजनेत आता मासिक 6.6 टक्के व्याज मिळत आहे. या व्याजदराने गुंतवणूक केली तर 10.91 वर्षात रक्कम दुप्पट होईल.
5. Post Office सीनियर सिटिजंस सेविंग्स स्कीम (post office senior citizen scheme)
पोस्ट ऑफिस सीनियर सिटिजंस सेविंग्स स्कीमवर (SCSS)7.4% व्याज दिला जात आहे. या योजनेत तुमची रक्कम 9.73 वर्षांमध्ये दुप्पट होईल.
6. Post Office PPF
पोस्ट ऑफिसच्या 15 वर्षांच्या पब्लिक प्रोव्हिडेंट फंडवर (PPF) सध्या 7.1%व्याज मिळत आहे. या दराने तुमचे पैसे दुप्पट होण्यासाठी 10.14 वर्षे लागतील.
7 पोस्ट ऑफीस सुकन्या समृद्धी योजना (Post Office Sukanya Samriddhi Yojana)
सुकन्या समृद्धी योजनेवर 7.6 व्याज मिळत आहेत. मुलींसाठी सुरु करण्यात आलेल्या या विशेष योजनेत रक्कम दुप्पट होण्यासाठी 9.47 इतका कालवधी लागेल.
8. Post Office National Saving Certificate
पोस्टाच्या नॅशनल सेविंग सर्टीफिकेट या योजनेवर एकूण 6.8 टक्के व्याज दिलत आहे. ही 5 वर्षांची बचत योजना आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यास आयकरही वाचवता येईल. या व्याजदरानुसार गुंतवणूक केल्यास 10.59 वर्षात रक्कम दुप्पट होईल.