जबरदस्त स्कीम : एकदाच रक्कम गुंतवा, दर महिन्याला कमाईची गॅरंटी
दरमहा सुरक्षित आणि निश्चित कमाई
नवी दिल्ली : कोणताही भारतीय नागरिक पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेत (POMIS)रक्कम गुंतवू शकतो. जर एखाद्यास दरमहा गॅरंटी उत्पन्न हवे असेल तर त्याच्यासाठी ही एक चांगली योजना आहे. त्याचबरोबर, एखाद्या व्यक्तीला सेवानिवृत्तीच्या वेळी एकहाती रक्कम हवी असेल तो दरमहा सुरक्षित आणि निश्चित कमाईसाठी या योजनेची निवड करू शकतो.
पोस्ट ऑफिसच्या मासिक उत्पन्न योजनेत सध्या वार्षिक 6.6 टक्के व्याज मिळत आहे. या योजनेत एकल आणि संयुक्त खाती उघडण्याची सुविधा आहे. आपण एकाच खात्याद्वारे जास्तीत जास्त साडेचार लाख रुपये आणि संयुक्त खाते असल्यास कमाल 9 लाख रुपयांची गुंतवणूक करू शकता. संयुक्त खात्यात जास्तीत जास्त 3 प्रौढ देखील असू शकतात. परंतु जास्तीत जास्त 9 लाख ठेवींची मर्यादा राहील.
टपाल कार्यालयाच्या मासिक उत्पन्न योजनेत दरमहा उत्पन्नाचे एक गणित असते. समजा तुम्ही एका खात्याद्वारे 4,50,000 रुपये जमा केलेत, आता त्यात वार्षिक 6.6 टक्के व्याज मिळेल. अशा प्रकारे जर तुम्ही 4..50 लाख जमा केले तर दरमहा तुम्हाला 2475 रुपये उत्पन्न मिळेल.
जर तुम्ही जॉईन अकाउंटने पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेत 9 लाख रुपये जमा केले असतील तर आता त्यावरील 6.6 टक्के वार्षिक व्याजदराप्रमाणे या रक्कमेवर एकूण व्याज 59400 रुपये असेल. ही रक्कम वर्षाच्या 12 महिन्यांत विभागली जाईल. अशा प्रकारे, प्रत्येक महिन्याचे व्याज साधारण 4950 रुपये असेल.
यासाठी सर्वात आधी तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते उघडावे लागेल. आपल्याकडे आधीपासूनच खाते नसेल तर जवळच्या कोणत्याही पोस्ट ऑफिसमधून मासिक उत्पन्न योजनेसाठी फॉर्म घ्यावा लागेल. हा फॉर्म योग्यरित्या भरा आणि साक्षीदार किंवा नॉमिनीची सही पोस्ट ऑफिसला द्या.
फॉर्मसह खाते उघडण्यासाठी सोबत ठरवलेली रक्कम किंवा चेक भरा. आपल्याकडे आयडी पुराव्यासाठी आधार कार्ड, पासपोर्ट किंवा मतदार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादी असणे आवश्यक आहे. अॅड्रेस प्रूफसाठी शासनाने जारी केलेले ओळखपत्र किंवा युटिलिटी बिल असायला हवे.
हे खाते उघडण्यासाठी प्रत्येकाला १००० रुपये रोख किंवा चेकद्वारे जमा करावे लागतात. आपण या कागदपत्रांची मूळ प्रत आपल्याकडे पडताळणीसाठी पोस्ट ऑफीसमध्ये न्यायला हवी.
पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेचा लॉक-इन कालावधी 5 वर्षांचा असतो. पण ते आणखी 5-5 वर्षे वाढवता येऊ शकते. यामध्ये खातेदारांना सिंगल आणि 3 प्रौढांसह संयुक्त खाते उघडण्याची सुविधा मिळते. आपण आपले शहर किंवा पत्ता बदलल्यास आपण हे खाते एका पोस्ट ऑफिसमधून दुसर्या शाखेत हस्तांतरित करू शकता. यावर, वार्षिक प्राप्त व्याज 12 भागात विभागले जाते आणि मासिक आधारावर खात्यात जमा केले जाते. जर आपण अमाऊंटटा कालावधी पूर्ण होण्यापूर्वी पैसे काढले तर त्यावर पेनल्टी भरावी लागेल.