Mahila Samman Savings Certificate: विविध बँकांमधून व्याज, कर्ज आणि अशा अनेक सुविधा खातेधारकांना पुरवल्या जात असतानाच पोस्ट ऑफिसही (Post Office) यात मागे राहिलेलं नाही. वेळोवेळी काही फायदेशीर आणि तितक्याच अनोख्या योजना पोस्टाकडूनही खातेधारकांपुढं सादर करण्यात आल्या आहेत. या योजनांच्या माध्यमातून खातेधारकांना (Tax Saving Scheme) करसवलतीही मिळत असल्यामुळं अनेकांचाच त्यांच्याकडे असणारा कलही वाढला. यातच आता आणखी एका योजनेही भर पडली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्र शासनाकडूनच यंदाच्या वर्षाचा अर्थसंकल्प सादर करतेवेळी या योजनेसंदर्भातील माहिती देण्यात आली. जिथं 'महिला सम्मान बचत प्रमाणपत्र 2023' योजना लागू करण्यात आल्याचं सांगितलं गेलं. ही योजना इतकी जबरजस्त की खुद्द महिला - बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनीही पोस्टात खातं सुरु केलं. पोस्टात जात त्यांनी रांगेतूनच खातं सुरु करण्यासाठीची औपचारिकता पूर्ण केली आणि 'महिला सम्मान बचत प्रमाणपत्र 2023'चा श्रीगणेशा केला. 


महिलांनी जास्तीत जास्त फायदा घ्यावा... इराणींचं आवाहन 


देशातील महिलांनी सरकारकडून राबवण्यात आलेल्या या योजनेचा जास्तीत जास्त प्रमाणात लाभ घ्यावा असं आवाहन खातं सुरु केल्यानंतर इराणी यांनी केलं. 


या योजनेतून तुम्हाला कसा होईल फायदा? 


'महिला सम्मान बचत प्रमाणपत्र' ही एक Saving Scheme आहे. या योजनेचा कालावधी साधारण दोन वर्षे इतका आहे. 2025 पर्यंत दोन वर्षांसाठी ही योजना उपलब्ध असेल. या योजनेअंतर्गत ठेवींवर सरसकट 7.5 टक्के इतका व्याजदर मिळतोय. मुख्य म्हणजे या योजनेत तुम्ही 1 हजार रुपयांपासून थेट 2 लाख रुपयांपर्यंची रक्कम ठेवू शकता. 7.5 टक्क्यांच्या व्याजरदानं दर तीन महिन्यांनी तुमच्या खात्यात व्याजाची रक्कम जमा केली जाईल. 


हेसुद्धा वाचा : बद्रीनाथ धामची कवाडं भाविकांसाठी खुली; 7 शुभाशिर्वाद देणाऱ्या या चारधाम यात्रेचं महत्त्वं पाहाच 


 


तुम्ही ज्या दिवशी या योजनेसाठी खातं सुरु करता तेव्हापासून पुढील दोन वर्षांपर्यंत तुम्ही या योजनेमध्ये सहभागी असता. शिवाय खातं सुरु केल्यानंतर बरोबर एका वर्षानं पात्र उर्वरित रकमेतून 40 टक्के रक्कम काढू शकतात अशीही मुभा या योजनेमध्ये देण्यात आली आहे. आहे की नाही तुमच्या फायद्याचीच योजना? बघा... वेळ वाया न घालवता Saving ची सुरुवात करा! योजनेची सुरुवात करण्यापूर्वी तुमचं मासिक उत्पन्न किंवा महिन्याला तुमच्या हाताशी असणारे पैसे, त्याहून होणारा खर्च आणि बचत या सर्व गोष्टींची व्यवस्थित आकडेमोड करून हातात काही पैसे उरवून या योजनेमध्ये नेमकी किती गुंतवणूक करायची या सर्व गोष्टींचा निर्णय लगेच घ्या. कारण, योजना दोन वर्षांसाठीचीच आहे बरं.