पीपीएफ नियमांत बदल, जाणून घ्या नवे नियम
सरकारने पब्लिक प्रॉव्हिडेंट फंड म्हणजेच पीपीएफ आणि नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (एनएससी) संबंधित नियमांत मोठे बदल केले आहेत.
नवी दिल्ली : सरकारने पब्लिक प्रॉव्हिडेंट फंड म्हणजेच पीपीएफ आणि नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (एनएससी) संबंधित नियमांत मोठे बदल केले आहेत.
या बदलांमुळे परदेशात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या नागरिकांना मोठा झटका लागू शकतो. केंद्र सरकारच्या नव्या नियमांनुसार जर परदेशात राहणाऱ्या एखाद्या व्यक्तीला एनआरआय (NRI)चा दर्जा मिळाल्यास त्याचं भारतात सुरु असलेलं पीपीएफ आणि एनएससी अकाऊंट बंद होऊ शकतं.
हा नवा नियम ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून अधिकृतरित्या लागू करण्यात आला आहे.
सरकारतर्फे हा बदल पीपीएफ योजना, १९६८ नुसार केला गेला आहे. यासंबंधी सरकारतर्फे काढण्यात आलेल्या अधिसुचनेनुसार पीपीएफमध्ये अकाऊंट सुरु करणारा व्यक्ती जर मॅच्युरिटी काळापूर्वी जर दुसऱ्या देशाचं नागरिकत्व घेतो तर त्याचं अकाऊंट तात्काळ बंद केलं जाईल. यानुसार पीपीएफ अकाऊंट असलेल्या व्यक्तीला त्याचं अकाऊंट बंद होईपर्यंतच्या तारखेपर्यंत व्याज मिळेल.
या नियमांनुसार एखाद्या व्यक्तीला एनआरआयचा दर्जा मिळाल्यास त्याच्या एनएससीची रक्कम देण्यात येईल. तसेच त्या तारखेपर्यंतच व्याजही त्याला देण्यात येईल.
सरकारच्या नियमांनुसार, पीपीएफ, एनएससी आणि पोस्ट ऑफीसतर्फे चालवण्यात येणाऱ्या मासिक आणि वार्षिक अवधीसाठी असलेल्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करण्याचा अधिकार नसणार.