PPF Investment | तुम्हीही PPF मध्ये गुंतवणूक केली असेल तर जाणून घ्या मॅच्युरिटीनंतरचे महत्वाचे 3 पर्याय
PPF Investment | पीपीएफ खातेधारकांकडे खात्याच्या मॅच्युरिटीवर 3 पर्याय आहेत. खातेदार खाते बंद करून संपूर्ण ठेव काढू शकतात.
मुंबई : गुंतवणूकीसाठी सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी हा उत्तम पर्याय आहे. ही फक्त एक बचत योजना आहे. या योजनेत पैसे गुंतवल्यास चांगल्या परताव्यासह तुमचा पैसा सुरक्षित देखील राहतो.
PPF योजनेच्या नियमांनुसार, PPF खातेधारकांना खात्याच्या मॅच्युरिटीवर 3 पर्याय आहेत.
खाते बंद करून संपूर्ण ठेव काढता येते.
ठेवी न वाढता खात्याची मॅच्युरिटी वाढवता येते.
नवीन ठेवी डिपॉझिट करून ठेवी मॅच्युरिटी वाढवता येते.
पीपीएफ खाते बंद केल्यानंतर संपूर्ण रक्कम काढणे
पैसे काढून खाते बंद करणे
15 वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर कोणतीही व्यक्ती आपले पीपीएफ खाते बंद करू शकते. पीपीएफ खाते उघडण्याच्या तारखेपासून मॅच्युरिटीची तारीख ठरवली जात नाही. PPF खात्यामध्ये ज्यावर्षी पहिली रक्कम जमा केली असेल त्या आर्थिक वर्षाच्या शेवटची तारीख मॅच्युरिटीची असते. पीपीएफ खाते बंद करण्यासाठी, धारकाला खाते बंद करण्याचा फॉर्म सबमिट करावा लागेल.
पैसे जमा न करता खाते कसे सुरू ठेवायचे?
कोणताही PPF खातेधारक पैसे जमा न करता मॅच्युरिटीनंतर त्याचे खाते सुरू ठेऊ शकतो. या अंतर्गत खातेदाराला खात्यात जमा झालेल्या पैशांवर व्याज मिळत राहील. खात्याच्या मॅच्युरिटीनंतर धारक प्रत्येक वर्षी खात्यात उपलब्ध असलेल्या शिल्लक रकमेतून कोणतीही रक्कम काढू शकतो.
फ्रेश डिपॉझिट करून खाते पुढे सुरू ठेवणे
नवीन ठेवी डिपॉझिट करून मॅच्युरिटीनंतर, तुम्ही तुमचे खाते सुरू ठेऊ शकता. याशिवाय तुम्ही तुमचे खाते 5 वर्षांसाठी वाढवू शकता. हे खाते 5 वर्षांसाठी एक किंवा अधिक वेळा वाढविले जाऊ शकते. हा पर्याय वापरल्यानंतर, खातेदार नंतर त्याची विनंती मागे घेऊ शकत नाही.