नवी दिल्ली : प्रद्युम्न हत्या प्रकरणाला आता नवं वळण आलंय. सीबीआयने या प्रकरणी अकरावीत असलेल्या विद्यार्थ्याला ताब्यात घेतलंय. इतकेच नाहीतर परीक्षा रद्द करण्यासाठी त्याने प्रद्युम्‍नची हत्या केल्याचा खुलासा करण्यात आलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ताब्यात घेण्यात आलेल्या अल्पवयीन विद्यार्थ्याला जुवेनाईल कोर्टात उभं करण्यात येणार आहे. तिथे पोलीस कोठडीची मागणी केली जाणार आहे. या संपूर्ण प्रकारावर ताब्यात घेण्यात आलेल्या मुलाच्या वडीलांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. मुलाला या प्रकरणात गोवलं जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय.


अकरावीच्या विद्यार्थ्याला पकडण्यात आल्यानंतर सीबीआयने धक्कादायक खुलासा केलाय. सीबीआयच्या सूत्रांनुसार या विद्यार्थ्याने परीक्षा रद्द करण्यासाठी हा मर्डर केला आहे. या विद्यार्थ्याला PTM ची तारीखही पुढे करायची होती. हाच विद्यार्थी चाकू घेऊन त्यादिवशी शाळेत गेला होता. प्रद्युम्‍नची हत्या केल्यानंतर आरोपीने चाकू फ्लश केला होता. 


सीबीआय सूत्रांनुसार, ही हत्या पूर्व नियोजित नव्हती पण या विद्यार्थ्याला असे काही करायचे होते जेणेकरून परीक्षेची तारीख पुढे ढकलली जावी. विद्यार्थ्याने म्हटलेही होते की, असे काही करेन की परीक्षा रद्द होईल. त्यामुळे प्रद्युम्‍न जसा टॉयलेटमध्ये दिसला त्याने त्याची हत्या केली.