लखनऊ : औपचारिकपणे राजकारणात येणाऱ्या प्रियंका गांधी यांचा हा निर्णय मोठी घटना म्हणून पाहिली जात आहेत.  काँग्रेसने प्रियंका गांधी यांना पूर्व उत्तर प्रदेशचे महासचिव म्हणून नियुक्त केले आहे. या संदर्भात राजकीय पक्षांची सतत प्रतिक्रिया येत आहेत. या मोठ्या घटनेवर निवडणुकीची रणनीती ठरविणारे जेडीयूचे नेते प्रशांत किशोर यांनी ट्विट केले आहे. विशेष शैलीत प्रियंका गांधी यांना ट्विट करुन शुभेच्छा देत अभिनंदन केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यांनी ट्विट करताना म्हटले आहे की, "भारताच्या राजकारणात बहुप्रतिक्षित असणारा हा क्षण अखेर आला. त्यांच्या येणाची वेळ, त्यांची वास्तविक भूमिका आणि त्यांच्या पदाबाबत चर्चा होत राहतील. मात्र, माझ्या मते खरी गोष्ट त्यांनी राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रियंका गांधी यांचे अभिनंत आणि त्यांना शुभकामना.



पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार यांच्या निवडणूक अभियानात त्यांचा महत्वाचा वाटा आहे, असे प्रशांत किशोर गेल्यावर्षी जेडीयूत प्रवेश केला. त्याआधी त्यांची २०१७च्या उत्तर प्रदेश निवडणुकीत काँग्रेस आणि समाजवादी पार्टी युतीसाठी महत्वाची भूमिका होती. मात्र, त्यांचा हा प्रयोग यशस्वी झाला नाही. भाजपकडून त्यांना मोठा पराभव पत्करावा लागला. 


याआधी बिहार विधानसभा निवडणुकीत २०१५ जनता दल आणि लालूप्रसाद यादव यांच्या पक्ष राष्ट्रीय जनता दलाने महाआघाडी करून लढवली. नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक झाली. त्या निवडणुकीत प्रशांत किशोर हे नीतीश कुमार यांचे निवडणूक अभियानाचे प्रमुख होते. त्या निवडणुकीत भाजपाला पराभव करावा लागला. तथापि, राष्ट्रीय जनता दल यांच्यातील मतभेदांमुळे नितीशकुमार यांनी पुन्हा एकदा महाआघाडीशी असलेले नाते तोडत भाजपच्या एनडीमध्ये सहभागी झालेत. 


प्रियंका गांधी-वढेरा यांची नियुक्ती एक मास्टरस्ट्रोक ठरणारी आहे. या नियुक्तीमुळे उत्तर प्रदेशात कार्यकर्त्यांत उत्साह आणि त्यांचे मनोबल वाढण्यासाठी मदत होणार आहे. या ठिकाणी काँग्रेसचा जनाधार कमी होत होता. आता या निवडीमुळे त्यात वाढ होण्याचे संकेत आहेत. उत्तर प्रदेशात लोकसभेच्या ८० जागा आहेत. त्यामुळे काँग्रेसचे या जागांवर अधिक लक्ष असणार आहे. तसेच समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीची युती आहे. येथे काँग्रेस दोघांना सहकार्य करणार आहे. त्यामुळे प्रियंका गांधी यांची भूमिका येथे महत्वाची ठरणार आहे.