प्रवीण तोगडीयांसाठी अहमदाबादमध्ये निदर्शनं
विश्व हिंदू परिषदेचे प्रवीण तोगडीया यांना पोलिसांनी समन्स काढलं असल्याचं सांगितलं जात आहे.
अहमदाबाद : विश्व हिंदू परिषदेचे प्रवीण तोगडीया यांना अटक झालेली नाही, ही अफवा असल्याचं पोलिसांनी म्हटल आहे, दुसरीकडे काही प्रवीण तोगडीया समर्थकांनी प्रवीण तोगडीया बेपत्ता असल्याचं सांगतं अहमदाबादमध्ये निदर्शनं केली आहेत.
अहमदाबादमध्ये खुर्च्यांची तोडफोड
तर त्यांच्या समर्थनार्थल प्रवीण तोगडीया नेमके गेले कुठे असा सवाल करत, अहमदाबादमध्ये काही गाड्या आणि खुर्च्यांची तोडफोड केली आहे. मात्र याविषयी अजून कुणीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.
प्रवीण तोगडीया समर्थकांची निदर्शनं
तोगडीया यांना अटक झाली की काय?, असा देखील सवाल उपस्थित केला जात आहे. मात्र प्रवीण तोगडीया यांना कशाविषयी समन्स आहे किंवा नाही, याविषयी कुणाचाही प्रतिक्रिया आलेली नाही. तर दुसरीकडे प्रवीण तोगडीया यांना अटक झाल्याची अफवा असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.