जम्मू : जम्मू-कश्मीरमध्ये सुंजवानमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एक गर्भवती महिला जखमी झाली होती. तिने आज एका मुलीला जन्म दिली आहे.


महिलेला लागली होती गोळी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दहशतवादी हल्ल्यात या महिलेला गोळी लागली होती. त्यानंतर उपचाराकरिता तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर महिलेची प्रसुती करण्यात आली. आई आणि मुलगी दोन्ही ही सुरक्षित आहेत. डिलिवरीनंतर महिलेने म्हटलं की, तिला जवानांचा अभिमान आहे. तिचा आणि मुलीचा जीव वाचवण्यासाठी त्यांना धन्यवाद देते. 


डॉक्टरांसाठी होतं आव्हान


महिलेवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी म्हटलं की, ही केस सामान्य नव्हती. एक गायनोकलॉजिस्ट म्हणून आमचा प्रयत्न असा होता की महिला आपल्या बाळासोबत घरी जावी. हा माझा टीमसाठी आणि रुग्णालासाठी खूप आनंदाचा क्षण होता.



४ दहशतवादी ठार


शनिवारी जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी सुंजवानमध्ये आर्मी कँपवर हल्ला केला होता. यामध्ये ५ जवान शहीद झाले. एका नागरिकाचा देखील यात मृत्यू झाला. यामध्ये १० जण जखमी झाले होते. जवानांनी सर्च ऑपरेशनमध्ये ४ दहशतवाद्यांना ठार केलं.