Trans Couple Pregnant: `तो` आई बनला! भारताच्या पहिल्या ट्रान्समेलने दिला बाळाला जन्म; Gender मुलं मोठ झाल्यावर...
या जोडप्याने बाळाचे Gender सांगितलेले नाही. मुलगा आहे की मुलगे हे बाळ मोठं झाल्यावर स्वत: ठरवेल असं ट्रान्सजेंडर कपलने सांगितले आहे (Pregnant Trans Couple Gives Birth To Baby).
Pregnant Trans Couple Gives Birth To Baby : अखेर त्याचं आई होण्याचं स्वप्न पूर्ण झाले आहे. भारताच्या पहिल्या ट्रान्समेलने दिला बाळाला जन्म दिला आहे. केरळमधील भारतातला पहिलं ट्रान्सजेंडर कपल (Transgender Couple) जिया (jiya) आणि जाहादने (jahad) सोशल मीडियावर (Social Media) आपल्या घरी नवा पाहुणा येणार असल्याची घोषणा केली होती. अखेर त्यांच्या आयुष्यात चिमुकल्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. मात्र, मुलं मोठ झाल्यावर याचं Gender ठरवणार असल्याचे या जोडप्याने सांगितले आहे.
जिया आणि जाहदने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर (Instagram) बेबीबंपचे फोटो शेअर केले होते. या प्रेग्नंसी फोटोशुटमुळे हे ट्रान्सजेंडर कपल चांगलेच चर्चेत आलय. यामुळे त्यांना बाळ कधी होणार याची सागळ्यांनाच उत्सुकता लागली होती.
जिया आणि जाहादने लिंग परिवर्तन केलं आहे. कोझीकोड मेडिकल कॉलेजच्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार गर्भधारणेसाठी या कपलला कोणत्याही शारिरीक आव्हानाला सामोरं जावं लागलं नाही.
जिया आणि जाहदने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर बाळाच्या जन्माची माहिती दिली आहे. 8 फ्रेबुवारी रोजी सकाळी 9.30 वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ऑपरेशनद्वारे बाळाचा जन्म झाला आहे. आई आणि बाळ दोघेही सुखरुप असल्याचे त्यांनी या पोस्टमध्ये म्हंटले आहे.
दीर्घ प्रतीक्षेनंतर आमचं स्वप्न पूर्ण झाले आहे. बाळाला हातात घेतल्यावर वेगळाच आनंद मिळाला. केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी देखील या जोडप्याचे अभिनंदन केले आहे. या बाळाला मिल्क बँकच्या (Milk Bank) माध्यमातून ब्रेस्ट फिडिंग करण्यात येणार आहे.
भारतात मुलाला जन्माला घालणारं हे पहिलंच ट्रान्समॅन कपल (Tranmale) आहे. शस्त्रक्रियेनंर जाहदने आपले ब्रेस्ट काढून टाकले. पण गर्भाशय आणि काही अवयव हे महिलेचेच असल्याने गर्भधारणेत काही अडचण आली नाही. जिया आणि जाहाद हे गेले तीन वर्ष एकत्र राहत असून ते केरळाचे आहेत. जियाचा जन्म पुरुष म्हणून झाला तो लिंग बदल करुन महिला झाली. तर जाहद ही महिला होती ती आता पुरुष बनली आहे. या जोडप्याने बाळाचे Gender सांगितलेले नाही. मुलगा आहे की मुलगे हे बाळ मोठं झाल्यावर स्वत: ठरवेल असं ट्रान्सजेंडर कपलने सांगितले आहे.