कर्नाटक : एका दलित मुलाशी विवाह केला म्हणून नाराज झालेल्या आई-बापानंच आपल्या गर्भवती मुलीला जिवंत जाळल्याची घटना कर्नाटकातल्या बीजापूरमध्ये घडलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वृत्तसंस्था 'एएनआय'नं दिलेल्या माहितीनुसार, बानू बेगम असं या २१ वर्षीय दुर्दैवी मुलीचं नाव आहे. आपल्याच गावात राहणाऱ्या २४ वर्षीय सायाबन्ना कोन्नूर या दलित मुलावर तिचं प्रेम जडलं... लग्नाला घरच्यांचा विरोध पाहून या दोघांनी गोव्यात जाऊन विवाह केला. 


३ जून रोजी बानू आणि सायाबन्ना गावात परतले होते... यावेळी बानू गर्भवती होती. ही गोड बातमी ऐकल्यानंतर घरच्यांचा विरोध आणि राग कमी होईल आणि आपला विवाह स्वीकारला जाईल, अशा आशेनं बानू गावात परतली होती... परंतु, ती ही आशा सपशेल चुकीची ठरली. दोन्ही कुटुंबांचा या लग्नाला विरोध कायम राहिला.


इतकंच नाही तर यामुळे पुन्हा एकदा दोन्ही कुटुंबांमध्ये वाद उफाळला... कुटुंबियांनी बानू आणि सायाबन्ना यांना बेदम मारहाण केली... कसाबसा आपला जीव वाचवत सायाबन्ना इथून सटकला... त्यानं धावत-पळतच पोलीस स्टेशन गाठलं... पोलिसांसहीत तो गावात दाखल झाला तेव्हापर्यंत बानूच्या कुटुंबीयांनी तिला जिवंत जाळलं होतं... तिचा काळा-ठिक्कर पडलेला निर्जिव मृतदेहच सायाबन्नाच्या हाती मिळाला. 


या प्रकरणात बानूची आई, बहिण, भाऊ आणि मेव्हण्याला अटक करण्यात आलीय.