हैदराबादमध्ये जन्मलं सर्वात लहान बाळ, ४ महिनेआधीच प्रसूती
जन्माच्यावेळी या मुलीचे वजन ३७५ ग्राम होते.
नवी दिल्ली : चेरी दक्षिण-पूर्व आशियातील सर्वात लहान मुलगी भारतात जन्माला आली आहे. जन्माच्यावेळी या मुलीचे वजन ३७५ ग्राम होते. गर्भधारणेच्या २५ व्या आठवड्यात म्हणजे चौथ्या महिन्यात तिचा जन्म झाला. जन्मावेळी ती २० सेंटीमीटरची म्हणजे खूपच लहान होती. हैदराबादच्या रेनबो हॉस्पीटलमध्ये फेब्रुवारीमध्ये या बाळाचा जन्म झाला. दक्षिण-पूर्ण आशियातील हे सर्वात लहान बाळ आहे. मुलीच्या आईचा याआधी ४ वेळा गर्भपात झाला होता.
आम्ही छत्तीसगढ वरून हैदराबादला गेलो, या दरम्यान खूप त्रास झाला. प्रिमॅच्यूअर डिलीव्हरी होणार असल्याचे कळाले. डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी आम्हाला सहकार्य केलं. आमचं बाळ वाचण्याच्या शक्यता खूप कमी होत्या पण आम्ही सकारात्मक विश्वास कायम ठेवल्याचे बाळाच्या आईने 'एएनआय'ला सांगितले.
जगवण्याचं आव्हान
जन्मलेल्या बाळासमोर खूप आव्हान होती पण आम्ही बाळाला किती खालया द्यायचं ? किती औषध द्यायच ? या सर्व गोष्टी ठरवल्याच डॉक्टरांनी सांगितलं. दोनदा तर मुलीचा जीव धोक्यात आहे असं वाटलं पण आम्ही यशस्वी झाल्याचेही ते म्हणाले.
वजन, उंचीत वाढ
ऑपरेशनदरम्यानच्या धोक्याची आई-वडीलांना जाणिव करुन दिली होती पण ते तिघेही वास्तवात मजबूत होते. प्रसूतीच्या १०५ दिवसांनंतरही मुलगी वेंटिलेटरवर होती पण आम्ही तिला विकसित करण्यासाठी अनेक उपाय केले. डिस्चार्चआधी हॉस्पीटलमध्ये तिच वजन २.४५ किलोग्रॅम आणि उंची ४५ सेंटीमीटर इतकी असल्याचे डॉ. निताशाने सांगितले.