नवी दिल्ली : संपूर्ण देशात जन्माष्टमी उत्सवात साजरी केली जात आहे. या वर्षी 2 दिवशी या जन्माष्टमीचा उत्सव पाहायला मिळत आहे. रविवारी श्रीकृष्णांचा जन्मोत्सवाची धूम होती. आज दहीहंडीचा सर्वत्र उत्साह पाहायला मिळतो आहे. या दरम्यान राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांनी देशवायिसांनी जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.



भगवान श्रीकृष्णांच्या 'जन्मभूमी' असलेल्या मथुरामध्ये मंदिराला विशेष सजावट केली आहे. मंदिरात दर्शनासाठी मोठ्या रांगा लागल्य़ा आहेत. मुंबईतल्या गिरगाव येथील इस्कॉन मंदिरात देखील जन्माष्टमीचा उत्सव साजरा केला जातो आहे. दिल्ली, जम्मू, गुजरात मध्ये देखील जन्माष्टमीचा उत्साह पाहायला मिळतो आहे.