नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची सून दिपा कोविंद या उत्तर प्रदेशमध्ये भाजपविरोधात निवडणूक लढवणार आहेत. त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

न्यूज २४ या वृत्तवाहिनीने दिलेल्या बातमीनुसार, दिपा यांना कानपूरमधील झिंझक नगरपालिका निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे.


दिपा रामनाथ कोविंद यांचा पुतन्या पंकज कोविंद यांच्या पत्नी आहेत. पंकज कोविंद यांनी म्हटलं की, त्यांनी पत्नी गेल्या काही दिवसांपासून नगरपालिका निवडणू लढवण्याची तयारी करत आहेत. पंकज यांच्या म्हणण्यानुसार, स्थानिक लोकांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना निवडणूक लढण्यासाठी सांगितलं. पण दिपा कोविंद यांना भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने चर्चेला उधाण आलं आहे.


उत्तर प्रदेशमध्ये ३ टप्प्यामध्ये मतदान होणार आहे. २२ नोव्हेंबर, दुसरे २६ नोव्हेंबर आणि २९ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. उत्तर प्रदेशमध्ये मार्च २०१७ मध्ये योगी आदित्यनाथ यांचं सरकार आल्यानंतर ही पहिली निवडणूक होत आहे. निवडणुकीत भाजपचे मित्र पक्ष शिवसेना आणि सुहेलदेव भारतीय समाज पक्ष हे देखील स्वतंत्रपणे निवडणुका लढत आहेत.