नवी दिल्ली : राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांना मिळणाऱ्या पगाराबद्दल तुम्हाला माहितेय का ? देशातील काही उच्चपद अधिकाऱ्यांना राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्यापेक्षा अधिक पगार मिळतो. 


तीनही दलाचे प्रमुख 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रपती हे  तीनही सशस्त्र दलाचे सर्वोच्च आहेत . देशातील तीन सेना दल प्रमुखांच्या तुलनेत राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांना कमी पगार मिळतो.


कायद्यात सुधारणा नाही 


दोन वर्षांपूर्वी ७ व्या वेतन आयोगाच्या शिफारसींच्या अंमलबजावणीनंतर आलेली असमानता काढून टाकण्यासाठी आजपर्यंत कायद्यात कोणतीही सुधारणा करण्यात आलेली नाही.


प्रस्तावावर निर्णय नाही 


राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि राज्यपालांचे वेतन वाढवण्याचा प्रस्ताव जवळपास एक वर्षापूर्वी कॅबिनेट सचिवालयाला मंजुरीसाठी पाठविण्यात आल्याचे 
 गृह मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. पण याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याचेही त्यांनी सांगितले. 


 सध्याचे वेतन 


 राष्ट्रपतींना दर महिन्याला दिड लाख , उपराष्ट्रपतींना १.२५ आणि राज्यांतील राज्यपालांना दरमहा १.१० लाख रुपये वेतन मिळत असल्याचे वृत्त आहे. ७ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी १ जानेवारी २०१६ पासून लागू झाल्या. त्यानंतर कॅबिनेट सचिवांना २.५ लाख दरमहा वेतन तर केंद्र सरकारच्या सचिवांना प्रतिमहा २.२५ लाख पगार मिळतो.


 मंत्रिमंडाळाची मंजुरी ?


 याबाबत सरकारच्या प्रवक्त्याला विचारले असता त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. मंत्रिमंडळातून मंजूरी मिळाल्यानंतर यासंबंधीचे विधेयक संसदेत सादर केले जाणार असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.


 २००८ मधली पगारवाढ 


 या प्रस्तावानुसार राष्ट्रपतींचे दरमाहा वेतन ५ लाख, उपराष्ट्रपतींचे दरमाहा वेतन ३.५ तर राज्यपालांचे वेतन ३ लाख दरमहा होऊ शकते. याआघी २००८ मध्ये, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि राज्यपाल यांचे वेतन वाढले होते.