नवी दिल्ली : ऱाष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी पद सोडण्याआधी आणखी दोन दयाअर्ज फेटाळून लावलेत. प्रणव मुखर्जी याचा राष्ट्रपतीपदाचा कार्यकाल २४ जुलैला संपतोय. मे महिन्याच्या अखेरीस या दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळून लावल्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फेटाळलेल्या याचिकांमधील पहिले प्रकरण २०१२मधील आहे. या प्रकरणात ४ वर्षाच्या मुलीवर बलात्कार तसेच तिची हत्या केली होती. तर दुसरे प्रकरण पुण्यातील असून यात कॅब ड्रायव्हर आणि त्याच्या साथीदाराने तरुणीवर बलात्कार हत्या केली होती. 


पहिले प्रकरण इंदूरमधील आहे. यात तीन लोग बाबू उर्फ केतन, जितेंद्र उर्फ जीतू(२०) आणि देवेंद्र उर्फ सनी(२२) या तीन आरोपींनी चार वर्षाच्या मुलीवर बलात्कार तसेच तिची हत्या केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते. 


याशिवाय पुण्यात प्रकरणी दोषी पुरुषोत्तम दशरथ बोराटे आणि प्रदीप यशवंत कोकडे यांना २००७मध्ये एका २२ वर्षीय तरुणीवर बलात्कार तसेच तिची हत्या केल्या प्रकरणात दोषी ठरवण्यात आले होते. ती तरुणी विप्रो कंपनीत काम करत होती.