COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : देशभरात ईदचा उत्साह आहे. शुक्रवारी ७ वाजून ३५ मिनीटांनी चंद्रदर्शन झाल्यानंतर दिल्लीतील जामा मशिदीच्या शाही इमामांनी देशातील सर्व मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही 'ईद-उल-फितर'च्या निमित्ताने मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देत देशातील बंधुभाव आणि प्रेम वाढण्यासाठी प्रार्थना केली. मशिदीमध्ये नमाज अदा करण्यासाठी मुस्लिम बांधवांनी गर्दी केलीय.



दिल्लीत देखील ईदचा उत्साह पाहायला मिळाला. मुस्लिम बांधवांनी एकमेकांच्या गळाभेट घेऊन दिल्या ईदच्या शुभेच्छा



मुंबईतही मझिद परिसरात मुस्लिम बांधवांनी मोठ्या प्रमाणात नमाज पडले. यावेळी पावसाची देखील उपस्थिती होती.



नमाज पडल्यानंतर दिल्लीतील नामा मझिद येथे मुस्लिम बांधव एकमेकांची भेट घेताना




पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ईद निमित्त दिल्या शुभेच्छा. ट्विटकरून दिल्या शुभेच्छा



एकमेकांना शुभेच्छा देत शांतता, समुद्धी वाढावी अशी भावना व्यक्त होतेय. ईद निमित्त बाजारपेठांमध्येही गर्दी होत असून खास करुन शिरकुर्मा खाण्यासाठी एकमेकांना घरी आवर्जून बोलावलं जात आहे.