नवी दिल्ली : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशाला संबोधित केले. यावेळी त्यांनी आपल्या कर्तव्याची जाणीव करुन दिली. भाषा, जगा आणि जगू द्या या सिद्धांतावर भारत पुढे चालत आहे. देशातील प्रत्येक व्यक्तीचा सन्मान केला पाहिजे आणि त्याच्यासोबत सन्मानाने वागले पाहिजे, जसे आपण आपल्यांसोबत वागतो. समाजाच्या आणि राष्ट्राच्या विकासासाठी तयार करण्यात आलेल्या पायाभूत सुविधांचा सुदुपयोग करणे आणि त्याचे संरक्षण करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे, असे राष्ट्रपती कोविंद म्हणालेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी राष्ट्रपतींनी देशवासियांना ७३व्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्यात. हा स्वातंत्र्य दिवस भारतमातेच्या सर्व मुलांसाठी एक आनंदाचा दिवस आहे. मग ते देशातील असो की परदेशात राहणारे नागरिक. जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० रद्द झाल्यानंतर आता विकास होण्यास मदत होईल आणि याचा लाभ तेथील नागरिकांना होईल. मला विश्वास आहे की या बदलाचा फायदा तेथे राहणाऱ्या नागरिकांना होणार आहे. भारत सरकारने जम्मू-काश्मीर संदर्भात घेतलेल्या या निर्णयामुळे तेथील नागरिकांना सुद्धा आता देशातील इतर नागरिकांप्रमाणे आयुष्य जगतील तसेच त्यांनाही समान अधिकार आणि सुविधांचा लाभ घेता येईल, असे राष्ट्रपती म्हणाले.



राष्ट्रपतींनी लोकशाही टिकविण्यासाठी मतदारांचे मोठे योगदान आहे. सर्व देशवासियांनी १७व्या लोकसभा निवडणुकीत सहभागी होत मतदान केले. लोकशाहीच्या या प्रक्रियेसाठी सर्वच मतदार अभिनंदनास पात्र आहेत. सर्वांनी एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून काम करायला हवे. तीन तलाक पद्धत रद्द झाल्याने मुलींना एक मोठा न्याय मिळाला आहे. जात आणि क्षेत्राच्या सीमा ओलांडून एकमेकांचा सन्मान आपण करत आहोत, असे राष्ट्रपती म्हणाले.    



समाजाच्या आणि राष्ट्राच्या विकासासाठी तयार करण्यात आलेल्या पायाभूत सुविधांचा सुदुपयोग करणे आणि त्याचे संरक्षण करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. प्रत्येक घरात शौचालय आणि पाणी उपलब्ध करुन देण्याचा पूर्ण लाभ तेव्हाच मिळेल जेव्हा या सुविधा आपल्या घरातील बहीण-मुलींना सशक्त करण्यास मदत करतील. 
येत्या २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांची १५०वी जयंती आहे. महात्मा गांधी यांची ही १५०वी जयंती देशभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाईल, असे राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात घोषीत केले.